आमदार निवासात भ्रष्टाचाराचा ‘मनोरा’; काम न करताच बिले, २८ आमदारांच्या खोल्यांमध्ये काम दाखवून लूट

By यदू जोशी on Sat, November 11, 2017 5:53am

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘मनोरा’ आमदार निवास आणि ‘आकाशवाणी’ आमदार निवासात ३ कोटी रुपयांहून अधिकची देखभाल, दुरुस्तीची कामे न करताच अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने

मुंबई : मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘मनोरा’ आमदार निवास आणि ‘आकाशवाणी’ आमदार निवासात ३ कोटी रुपयांहून अधिकची देखभाल, दुरुस्तीची कामे न करताच अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने पैसा लाटल्याचा आरोप करणारे पत्र भाजपाच्याच एका आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दहा आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करताच लाखो रुपये उकळण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी यांनी म्हटले असून त्यांनी केलेल्या चौकशीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, उपअभियंता भूषणकुमार फेगडे आणि शाखा अभियंता धोंडगे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यातील फेगडे व धोंडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. वाळके यांची केवळ बदली करण्यात आली आहे. चौकशीमध्ये भ्रष्टाचार समोर आल्यानंतरही अद्याप अधिकारी वा कंत्राटदारांविरुद्ध बांधकाम विभागामार्फत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. आता या दहा व्यतिरिक्त आणखी १८ आमदारांच्या खोल्यांमध्ये कोणतेही काम न करता कंत्राटदारांना पैसा देण्यात आल्याचे पत्र आमदार चरणदास वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह दिले आहे. या प्रकरणाची चौकशी आता बांधकाम विभागाच्या दक्षता पथक मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्याकडे देण्यात आली आहे. बहुतेक प्रकरणात निविदा काढून तीन महिन्यांच्या आत कामे झाल्याचे दाखवत कंत्राटदारांना बिलेदेखील अदा करण्यात आली.

संबंधित

Government Employees Strike :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारसोबतच्या चर्चेनंतर कोंडी फुटली
पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडने कारणे दाखवा नोटीस
Maratha Reservation : मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार
उघडले स्वर्गाचे दार...
मंत्रालयातील बांधकाम घोटाळ्यांची चौकशी; कामे न करताच लाखो रुपयांची बिले काढल्याची तक्रार

महाराष्ट्र कडून आणखी

अ‍ॅप बेस टॅक्सीचालकांच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस!
लाचखोर साहाय्यक धर्मादाय आयुक्त दोषी
अप्पर पोलीस महासंचालकांच्या दालनातून मोबाइल गायब
तापमानाचे हेलकावे आणि घामाच्या धारा
अण्णा हजारेंना साक्षीदार करण्यास हायकोर्टाचा नकार

आणखी वाचा