शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा- खा. अशोकराव चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 05:08 PM2017-10-08T17:08:18+5:302017-10-08T17:10:19+5:30

काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.

Make Congress victorious for all-round development of the city - eat Ashokrao Chavan | शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा- खा. अशोकराव चव्हाण

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा- खा. अशोकराव चव्हाण

Next

नांदेड - काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. १ व २ मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तरोडा येथील भवानी चौकात रविवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप, मा. आ. कल्याण काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय देशमुख लहानकर, संतोष पांडागळे व दोन्ही प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, शहराचा विकास काँग्रेसच्या कार्यकाळातच झाला आहे. गुरु-ता-गद्दी तसेच नांदेड शहराचा जेएनयूआरएम योजनेत समावेश झाल्याने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अडीच हजार कोटींचा निधी दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरातील बाह्य वळण रस्ते, उड्डाणपूल, जलकुंभ, स्टेडियम, विमानतळ, झोपडपट्टी वासियांना पक्की घरे यासह अन्य विकासकामे करण्यात आली. यामुळे शहराचा ख-या अर्थाने विकास झाला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात शहरासाठी कोणताही विकास निधी दिला नाही. स्मार्ट सिटी योजनेचे निकष पूर्ण केल्यानंतर नांदेड शहराचा या योजनेत समावेश केला नाही. या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या निवडणुकीत मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली मात्र गेल्या दोन वर्षात फक्त सहा लाख युवकांनाच रोजगार मिळाला. नोटाबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला असून, अनेकांचा रांगेत मृत्यू झाला. रेशनिंगवर मिळणारी साखर भाजप सरकारने बंद केली. गोरक्षणाच्या नावाखाली दलित अल्पसंख्याक समाजाच्या लोकांच्या हत्या सुरू आहेत. या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून, भाजपा सरकारच्या परतीच्या प्रवासास नांदेडातून सुरुवात करा असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी मतदारांना केले.  

 यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड,  माजी मंत्री रमेश बागवे, आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप मा. आ. कल्याण काळे, यांनीही भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली काँग्रेस तसेच खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वातच नांदेडचा विकास होऊ शकतो यासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. या प्रचारसभेस प्रभाग क्र.१ व २ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Make Congress victorious for all-round development of the city - eat Ashokrao Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.