भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती-अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:34 AM2018-05-02T05:34:24+5:302018-05-02T05:34:24+5:30

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही.

Maharashtra's downfall due to wrong policies of BJP-Ashok Chavan | भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती-अशोक चव्हाण

भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती-अशोक चव्हाण

Next

मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.
टिळक भवन या दादर येथील काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर अशोक चव्हाण बोलत होते. तत्पूर्वी चव्हाण यांनी हुतात्मा चौकात जाऊन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, चव्हाण यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. भाजपा सत्तेत आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी, दोन-चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करीत आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. देशाला भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी भाजपाला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक चव्हाण बुधवारी, २ मे रोजी नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. अशोक चव्हाण उद्या सकाळी ११.३० वाजता कात्रादेवी सागवे ता.राजापूर येथे स्थानिकांशी संवाद साधणार आहेत व त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी त्यांसोबत असतील.

Web Title: Maharashtra's downfall due to wrong policies of BJP-Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.