Maharashtra Rain Live Updates : कोल्हापुरात मुसळधार पाऊस; राजाराम बंधारा पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 09:14 AM2019-06-29T09:14:39+5:302019-06-29T22:39:53+5:30

मुंबई  - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या  मुंबईकरांना पावसाने सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. ...

Maharashtra Rain Live Updates : Mumbai Train, Railway, Road traffic disrupted due to rain | Maharashtra Rain Live Updates : कोल्हापुरात मुसळधार पाऊस; राजाराम बंधारा पाण्याखाली

Maharashtra Rain Live Updates : कोल्हापुरात मुसळधार पाऊस; राजाराम बंधारा पाण्याखाली

Next

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांना पावसाने सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. तर पावसामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरात भिंत कोसळणे, झाड पडणे अशा दुर्घटना घडताना पाहायला मिळत आहे. 

पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलसेवा खोळंबली मध्य रेल्वे 15 मिनिटे उशिराने सुरु, वाढता पाऊस आणि सुट्टी पाहता लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्याची शक्यता आहे. हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिराने धावत आहे तर पश्चिम रेल्वे 5 मिनिटे उशिराने आहे. ट्रान्स हार्बर सुरळीत सुरु आहे. 

08:28 PM

वीज पडून यवतमाळमध्ये तिघांचा मृत्यू

यवतमाळ : वीज पडून जिल्ह्यात तिघांचा मृत्यू. दोन शेतकऱ्यांसह एका १२ वर्षीय मुलाचा समावेश. नेर, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यातील शनिवारी दुपारच्या घटना. दादाराव लुकाजी राठोड (५५) रा. मारवाडी, चंद्रभान दमडू चव्हाण (३५) रा. आरंभी आणि प्रकाश मानतुटे (१२) रा. निंगनूर अशी मृतांची नावे आहे. या तिन्ही तालुक्यात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला.

08:13 PM

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर तर दिवसभर  50 मिलीमीटर पाऊस

07:58 PM

कोल्हापुरात मुसळधार पाऊस; राजाराम बंधारा पाण्याखाली

शाहूवाडी परिसरात दिवसभर संततधार पावसामुळे नद्या भरून वाहत आहेत. राजाराम बंधारा आज सायं. ६.३० वा.पाण्याखाली गेला. या वेळी बंधाऱ्याजवळ १७ फूट इतकी पाण्याची उंची होती.

05:55 PM

अहमदनगरमधील जामखेड शहरात जोरदार पावसाला सुरुवात

05:33 PM

ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले


05:09 PM

पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ


04:30 PM

पनवेलमध्ये नदीत वाहून गेलेली कार बाहेर काढण्यात यश

04:16 PM

ठाणे जिल्ह्यात सरासरी 191 मिमी पाऊस, धरणातील पाणीसाठ्यात वाढ


04:04 PM

वसईत दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीवरील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला असून 12 गावांचा संपर्क तुटला आहे.

03:47 PM

कोकण विभागात सरासरी 130.80 मिमी. पावसाची नोंद

03:42 PM

पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस, पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात



 

03:06 PM

पावसामुळे बांद्रा-कुर्ला परिसरात वाहतूक कोंडी 



 

01:24 PM

मुंबई महापालिका प्रशासन मान्सूनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सज्ज

मुंबईतील पाऊस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन टीमची कंट्रोल रुममधून करडी नजर 



 

11:52 AM

पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील 24 तासांत कोकण आणि गोवा येथे मुसळधार पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. तर मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं सांगितलं जातंय. 



 

10:35 AM

सायन कोळीवाडा येथे गाड्यांवर झाडं कोसळलं

मुंबईतील सायन कोळीवाडा येथे पार्किंगला उभ्या असणाऱ्या 2 कारवर झाड कोसळल्याने झालं नुकसान 



 

10:18 AM

मुंबईत पावसाची जोरदार बँटिंग सुरुच

मुंबई शहरात गेल्या 24 तासात 127 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर पश्चिम उपनगरात 170 मिमी, पूर्व उपनगरात 197 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील 24 तास असाच मुसळधार पाऊस सुरु राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे. 



 

09:20 AM

चेंबूर परिसरात रिक्षावर भिंत कोसळली

पावसामुळे मध्यरात्री 2 च्या सुमारास चेंबूर परिसरात भिंत पार्किंगला उभ्या असणाऱ्या रिक्षावर कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. 



 

09:17 AM

मुंबईसह कोकणात आजही बरसणार मुसळधार पाऊस

पुढील 24 तासांत मुंबई, ठाणे, कोकण परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 



 

Web Title: Maharashtra Rain Live Updates : Mumbai Train, Railway, Road traffic disrupted due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.