अखेर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:57 PM2019-05-21T12:57:39+5:302019-05-21T13:05:28+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.

maharashtra pg medical admission 2019 maratha students protest ends after maharashtra governor signed ordinance to provide quota under sebc reservation | अखेर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे!

अखेर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे!

Next

मुंबई :वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरु असलेले आंदोलन 15 दिवसांनी मागे घेतले आहे. 

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र, राज्य सरकारने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या अध्यादेशामुळे 2019-20 या वर्षासाठी शिक्षण संस्थांमध्ये पीजी आणि एमबीबीएस प्रवेशात मराठा आरक्षण लागू होणार आहे. 

यावर्षी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला.

 

Web Title: maharashtra pg medical admission 2019 maratha students protest ends after maharashtra governor signed ordinance to provide quota under sebc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.