Maharashtra Lok Sabha Election Results & Winners 2019, Live Vote Counting Results | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: राज्यात महायुतीचा झेंडा, महाआघाडीला जनतेनं नाकारलं
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: राज्यात महायुतीचा झेंडा, महाआघाडीला जनतेनं नाकारलं

मुंबई : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आतापर्यंचे निकाल पाहता राज्यात महायुतीचा झेंडा फडकला आहे. तर, महाआघाडीला जनतेने नाकारले आहे. 

राज्यात 12, 19, 23 आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते. यामध्ये नितीन गडकरी, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य मत यंत्रात बंद झाले होते. मात्र, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर शिवसेना-भाजपाच्या महायुतीने आघाडी घेतली आहे. 

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत राज्यात 48 जागांपैकी 42 जागांवर भाजपा - शिवसेना  महायुतीने विजय मिळवत बाजी मारली होती. तर कांग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीला जास्त जागा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LIVE

Get Latest Updates

09:08 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ७७ हजार ३८७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय. जिल्हाधिकारी यांची घोषणा.

09:00 PM

शिर्डीचे साईबाबा शिवसेनेला पावले, सदाशिव लोखंडे पुन्हा जिंकले! 

08:28 PM

पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित(5 लाख 80 हजार 279 मते) यांनी बविआच्या बळीराम जाधव(4 लाख 91 हजार 596 मते) यांचा  88 हजार 693 मतांनी पराभव केला. 

08:14 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी ११३१७५ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ५२२५२८  तर माणिकराव ठाकरे यांना ४०९३५३ मते.

07:38 PM

शिवसेनेने गड राखला, राहुल शेवाळे विजयी 

06:49 PM

खैरे आणि जलील समर्थकांची मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक 

06:26 PM

अमरावती लोकसभा मतदार संघातील सोळाव्या फेरीअखेर महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर 43313 मतांची आघाडी.

05:26 PM

राज ठाकरेंची 'एका शब्दात' प्रतिक्रिया 

05:21 PM

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार डाॅ. हिना गावित 95,296 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

04:45 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विसाव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची  स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ५१ हजार ३७७ मतांची आघाडी. गतवेळेपेक्षा आघाडी वाढली.

04:42 PM

अकोला लोकसभा मतदारसंघाचे  भाजपचे संजय धोत्रे यांची सर्वाधिक मताधिक्याकडे वाटचाल; आतापर्यंत २६३७२१ मतांची आघाडी.

04:41 PM

राहुल शेवाळे आघाडीवर, एकनाथ गायकवाड पिछाडीवर

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली आहे. 

04:32 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी ५७८५९ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ३३७६३९  तर माणिकराव ठाकरे यांना २७९७८० मते.

04:31 PM

अकोला लोकसभा मतदारसंघात बाविसाव्या फेरीअखेर भाजपचे संजय धोत्रे हे ४ लाख ७८ हजार ३७८ मतं घेऊन आघाडीवर आहेत.

04:28 PM

हातकणंगले  लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे आतापर्यंत मोजलेल्या मतांमध्ये 90194 मतांनी आघाडीवर

04:20 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात अठराव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची  स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ३८ हजार १८१ मतांची आघाडी.

03:50 PM

नांदेडमधून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण 50 हजार मतांनी पराभूत

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार  50 हजारांनी पराभूत.

03:47 PM

स्वाभिमान ही स्वार्थाची कौटुंबिक संघटना, विनायक राऊत यांची टीका

रत्नागिरी: स्वाभिमान हा पक्ष नाही, ती स्वार्थासाठीची कौटुंबिक संघटना आहे, अशी टीका  रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी स्वाभिमान पक्षावर केली आहे.

03:34 PM

अमरावती लोकसभा मतदारसंघात महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर ३६५३० मतांची आघाडी

03:20 PM

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात नवव्या फेरीअखेर भाजपचे अशोक नेते 49 हजार 528 मतांनी आघाडीवर

02:56 PM

नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रताप पाटील विजयाच्या उंबरवठ्यावर

02:55 PM

जनतेचा कौल मान्य, पराभवाचे विश्लेषण करणार नाही - अनंत गिते

जनतेने दिलेला कौल मी मान्य केला आहे. पराभव कुणामुळे झाला, त्याचे विश्लेषण करणार नाही, अशी प्रतिक्रिया रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे.

02:45 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी ४४६५४ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना २५१९५२  तर माणिकराव ठाकरे यांना २०७२९८ मते. आतापर्यंत पाच लाख ५७ हजार मतांची मोजणी. आणखी एवढी मतमोजणी बाकी. वंचित आघाडीचा उमेदवार पोहोचला ४८ हजारांवर.

02:38 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौदाव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ११ हजार ६१२ मतांची आघाडी.

02:17 PM

रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेवार सुनील तटकरे विजयाच्या उंबरठ्यावर  

02:11 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची  स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर ९६ हजार ८६ मतांची आघाडी.

02:03 PM

भाऊबंदकीच्या लढतीत कोण बाजी मारणार? ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर 

01:45 PM

नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण पिछाडीवर; प्रताप पाटील चिखलीकर यांची २५२१७ मतांची आघाडी

01:44 PM

अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर 9858 मतांची आघाडी घेतली आहे.

01:26 PM

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात आतापर्यंत बारा फे-याअंती साडे पाच लाख मतांची मोजणी पार पडली. आणखी साडे पाच लाख मतांची मोजणी बाकी आहे. मतमोजणीच्या एकूण 24 फे-या होणार आहेत.

01:23 PM

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार हिना गावित जवळपास सत्तर हजारापेक्षा अधिक मतांनी विजयी. 

01:18 PM

डोंबिवली: शिवसेना मध्यवर्ती कार्याल यासमोर फटाक्यांची आतिषबाजी, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे निवडणुकीत आघाडीवर असून मताधिक्य वाढत आहे

01:07 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी २३२६४ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना १७३२९८  तर माणिकराव ठाकरे यांना १५००३४ मते.

01:06 PM

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात  ९ व्या फेरीअखेर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची आघाडी कायम, शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंची दुसऱ्या स्थानी झेप, हर्षवर्धन जाधव तिसऱ्या स्थानी.

12:50 PM

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर घेतली ५६५६६ मतांची आघाडी घेतली आहे.

12:47 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १६८११ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना १४४७३६  तर माणिकराव ठाकरे यांना १२७९२५ मते. एकूण मतमोजणी ३ लाख ३२ हजार १५५.

12:43 PM

ठाणे लोकसभा मतदारसंघात  पाचव्या फेरी अखेर शिवसेनेचे राजन विचारे 76 हजार मतांनी आघाडीवर

12:42 PM

नांदेड लोकसभा मतदार संघात अशोकराव चव्हाण 19 हजार 503 मतांनी पिछाडीवर

12:40 PM

अमरावती लोकसभा महायुतीचे आनंदराव अडसूळ बडनेरा, अमरावती, तिवसा, अमरावती विधानसभा मतदारसंघात आघाडीवर, महाआघाडीच्या नवनीत राणा दर्यापूर व मेळ्घाट मतदारसंघात आघाडीवर

12:39 PM

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात नवव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची  स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर ७० हजार मतांची आघाडी.

12:36 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नवव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची  स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर ७० हजार मतांची आघाडी.

12:35 PM

बीड लोकसभा मतदारसंघात अकराव्या फेरीअखेर भाजपा प्रीतम मुंडे 51000 मतांनी आघाडीवर

12:27 PM

लातूर लोकसभा मतदारसंघात 12 व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे 60 हजार 244 मतांनी आघाडीवर

12:26 PM

अकोला लोकसभा मतदार संघात सातव्या फेरीअखेर भाजपचे संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर ५८९४० मतांनी आघाडी घेतली आहे.

12:25 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १८७२३ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना १२१६९८ तर माणिकराव ठाकरे यांना १०२९७५ मते.

12:12 PM

शिवसेनेची 'शिंदे'शाही जोमात, विरोधक कोमात 

12:00 PM

मुंबई - शिवसेना भवनबाहेर फटाक्यांची आतषबाजी सुरू

11:59 AM

पूनम महाजनांना आघाडी; प्रिया दत्त 42 हजार मतांनी 

11:57 AM

बीड लोकसभा मतदारसंघात नवव्या फेरीअखेर भाजपा प्रीतम मुंडे 65000 मतांनी आघाडीवर 

11:47 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १३७७७ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना १०४७९२ तर माणिकराव ठाकरे यांना ९१०१५ मते.

11:35 AM

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदास संघात मनोज कोटक यांची सव्वा लाखाच्या फरकाने आघाडी,  २ लाख ७४ हजार ६०८ मते.

11:34 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १३३४७ मतांनी आघाडीवर. दोन हजार मतांनी आघाडी कमी झाली. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ९५६१४  तर माणिकराव ठाकरे यांना ८२२६७ मते. एकूण दोन लाख १९ हजार २७६.

11:27 AM

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे 26219 मतांनी आघाडीवर.

11:26 AM

लातूर लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे 43 हजार 24 मतांनी आघाडीवर

11:18 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १५५६१ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ७८६२७ तर माणिकराव ठाकरे यांना ६३०६६ मते.

11:08 AM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना पाचव्या फेरीनंतर ३८ हजारांची आघाडी.

11:02 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १३९८२ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ७४८८५ तर माणिकराव ठाकरे यांना ६०९०३ मते. वंचित आघाडीचे प्रवीण पवार १६७८६, प्रहारच्या वैशाली येडे ३९१७, भाजपा बंडखोर पी.बी. आडे २२२०, बसपा अरुण किनवटकर यांना  १७७१ मते.

11:01 AM

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अशोक नेते हे काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यापेक्षा 20 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

10:43 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात बाराव्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी १२७६१ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ६२३४१ तर माणिकराव ठाकरे यांना ४९५८० मते. एकूण १ लाख ४० मतांची मोजणी.

10:41 AM

लातूर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सुधाकर शृगारे हे 31 हजार 681 मतांनी आघाडीवर आहेत.

10:33 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दहाव्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी १०२५८ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ५४३१० तर माणिकराव ठाकरे यांना ४४०५२ मते.

10:32 AM

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना पहिल्या फेरीअखेर एकूण 26138 मते मिळाली तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांना 13761 मते मिळाली. पहिल्या फेरीअखेर गजानन कीर्तिकर 12377 मतांनी आघाडीवर आहेत.

10:20 AM

अमरावती लोकसभा मतदारसंघ मतमोजणीची पहिल्या फेरीनंतर महायुतीचे उमेदवार (शिवसेना) आनंदराव अडसूळ यांना  ६७३४० मते, महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना ६३१०९ मते, आनंदराव अडसूळ ४२३१ मतांनी आघाडीवर.

10:09 AM

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनी दसऱ्या फेरीत  16824 मतांनी आघाडी घेतली आहे. 

10:04 AM

पालघरमध्ये शिवसेनेच्या राजेंद्र गावितांना एकूण 2 लाख 93 हजार 417 मते तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 761 मते मिळाली. 9 व्या फेरीपर्यंत बहुजन विकास आघाडीचे जाधव 344 मतांनी पुढे.

10:02 AM

कोल्हापूरात राष्ट्रवादीला धक्का बसणार?

कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यावर तिसऱ्या फेरीअखेर तब्बल ४५ हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. त्या ठिकाणी शिक्षण सम्राट डी.वाय.पाटील यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीत आणले आणि पाटील यांचे पुत्र माजी राज्यमंत्री व कोल्हापुरातील काँग्रेसचे तरुण नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची अडचण करण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापुरात बंटी पाटील समर्थकांनी लावलेल्या बोर्डनी खळबळ माजली. ‘आमचं ठरलंय’ एवढेच त्यावर लिहिलेले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बंटी पाटील यांनी वचपा काढण्यासाठी शिवसेनेला मदत केली अशी चर्चा आहेच.

10:01 AM

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला धक्के

पश्चिम महाराष्ट्रात घड्याळाचे काटे बंद पडतात की काय अशी भीतीदायक परिस्थिती दिसत आहे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ, कॉलर उडविण्यासाठी प्रसिद्ध असलेले साताराचे राजे उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार ८ ते १५ हजार मतांनी मागे पडले आहेत.

10:00 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी चार हजार ९३९ मतांनी आघाडीवर. गवळी यांना २४ हजार ४२६ तर माणिकराव ठाकरे यांना २१ हजार ७२९ मते.

09:58 AM

नंदुरबारमध्ये हिना गावित पिछाडीवर, विदर्भात काँग्रेसला अच्छे दिन येणार ?


09:49 AM

नितीन गडकरी पहिल्याच फेरीत आघाडीवर

नागपुरात काँग्रेसच्या बाजूने डीएमके (दलित मुस्लिम कुणबी) फॉर्म्यूला काम करेल आणि भाजपचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसेल हा होरा पार चुकताना दिसत आहे. गडकरी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे.

09:48 AM

नागपूर लोकसभा मतदार संघात पहिल्याच  फेरीत भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी 15940 मतांनी आघाडीवर

09:47 AM

नाशिक लोकसभा मतदार संघातून मागे पडलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे पुन्हा आघाडीवर, सुमारे साडे 8 हजार मतांची आघाडी

09:42 AM

नंदुरबार - काँग्रेसचे के.सी. पाडवी 11 हजार मतांनी आघाडीवर

09:41 AM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दुस-या फेरीअखेर शिवसेनेच्या भावना गवळी तीन हजार २७४ मतांनी आघाडीवर. भावना गवळी यांना २० हजार ६५२ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना १७ हजार ३७८ मते. वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार ४३३२, प्रहारच्या वैशाली येडे १४०५, बसपा अरुण किनवटकर ४७६, भाजपा बंडखोर अपक्ष पी.बी. आडे ८८६. एकूण ४७ हजार ४६२ मतांची मोजणी.

09:32 AM

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक ६४ हजार १६९ मतं, तर संजय पाटील ४७ हजार ३१७ मतं; मतमोजणी अद्याप सुरु.

09:31 AM

ठाणे लोकसभेच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना ओवळा माजिवडा 3353, कोपरी पाचपाखाडी 2954, ठाणे 3434, ऐरोली 1849 बेलापूर 1745 मते तर मिराभाईंदरला राष्ट्रवादीचे आनंद परांजपे मतांनी 760 मतांनी आघाडीवर आहेत.

09:29 AM

धनराज महाले आघाडीवर

भाजप शिवसेनेने ज्या जागा हक्काच्या मानल्या होत्या त्यात सुरुवातीला तरी त्यांना धक्का बसताना दिसतोय. उदा. दिंडोरीमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत उडी घेऊन घड्याळावर लढत असलेले धनराज महाले पुढे आहेत. तिथे भाजपने डॉ.भारती पवार यांना राष्ट्रवादीतून भाजपात आणून त्यांच्या हाती कमळ दिले आहे.

09:21 AM

शिरुरमध्ये चित्र बदलण्याची स्थिती

शिरुरमध्ये शिवसेनेचे प्रस्थापित नेते आणि खासदार शिवाजीराव अढ्याळराव पाटील पिछाडीवर असणे याला जातीपातीचा संदर्भ आहे. या मतदारसंघात मराठा विरुद्ध माळी असा संघर्ष झाला होता. शिवाजीराव मराठा विरुद्ध माळी समाजाचे असलेले डॉ.अमोल कोल्हे माळी समाजाचे असे जातीय ध्रुवीकरण झाले आहे. सध्या कोल्हे पुढे असले तरी चित्र बदलू शकते.

09:09 AM

हिना गावित पिछाडीवर असणे हा भाजपसाठी मोठा धक्का

नंदुरबारमध्ये डॉ.हिना गावित पिछाडीवर असणे हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. तिथे भाजपचे बंडखोर आणि संघाचे स्वयंसेवक डॉ.सुहास नटावदकर यांनी गावित यांची डोकेदुखी वाढविली असे सुरुवातीच्या निकालावरून तरी दिसते. संघ परिवाराची नाराजी गावित यांना भोवणार असे सुरुवातीच्या कलावरून दिसत आहे. काँग्रेसचे सातवेळचे आमदार के.सी.पाडवी यांनी आघाडी घेतली आहे.

09:02 AM

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मनोज कोटक आघाडीवर आहेत.

08:56 AM

सातारा लोकसभा मतदासंघात पोस्टल मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले आघाडीवर...

08:56 AM

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजपत्रित अधिकारी यांची स्वाक्षरी नसल्याने पहिली सहा टपाली मते रद्द

08:55 AM

कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक 14656 ने आघाडीवर

08:48 AM

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे आघाडीवर, वंचित बहुजन आघाडीने अद्याप खाते उघडले नाही.

08:48 AM

नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर आहेत.

08:41 AM

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आघाडीवर आहेत.

08:26 AM

 ठाणे लोकसभा मतदार संघात अद्याप मतमोजणीला सुरुवात नाही.

08:21 AM

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी पोस्टल मतांची मोजणी सुरु.

07:51 AM

साताऱ्यात उदयनराजे फॅक्टर पुन्हा चालणार की शिवसेना गड भेदणार? 

07:46 AM

मुलाच्या यशासाठी आईचे साई दरबारी साकडे

शिर्डी : नगर दक्षिणचे भाजपसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या यशासाठी त्यांच्या मातोश्री व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आज पहाटे लोणीवरून शिर्डीसाठी साईंच्या दर्शनासाठी पायी असून आहेत. 

07:42 AM

कांचन कुल निवडणूक निकालापूर्वी सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेणार

पुण्यातील बारामती मतदार संघाच्या भाजपा उमेदवार कांचन कुल निवडणूक निकालापूर्वी सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत. 

07:35 AM

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

English summary :
Maharashtra election result Live update In Marathi: Find party wise and constituency wise result with winner. Also check live vote counting and runner up candidates list. For more latest election news in marathi must visit lokmat.com.


Web Title: Maharashtra Lok Sabha Election Results & Winners 2019, Live Vote Counting Results
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.