महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निकाल 2019: आई शप्पथ...जेवढी मतं मिळवून उमेदवार जिंकू शकतो, तेवढी मतं 'नोटा'ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 09:28 PM2019-05-23T21:28:28+5:302019-05-23T21:29:09+5:30

युतीही नको आणि आघाडीही नको अशा लोकांना नोटांचा वापर केला

Maharashtra Lok Sabha Constituency 2019: may people choose voting for NOTA | महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निकाल 2019: आई शप्पथ...जेवढी मतं मिळवून उमेदवार जिंकू शकतो, तेवढी मतं 'नोटा'ला!

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निकाल 2019: आई शप्पथ...जेवढी मतं मिळवून उमेदवार जिंकू शकतो, तेवढी मतं 'नोटा'ला!

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सकाळपासून सुरु आहे. जवळपास राज्यातील निकाल स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या पारड्यात नागरिकांना मतदान करुन काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा नाकारलं असल्याचं दिसून आलं. राज्यातील 27.6 टक्के(1 कोटी 47 लाखांहून अधिक) लोकांची मतं भाजपाला मिळाली आहेत. शिवसेनेला 23.3 टक्के( 1 कोटी 23 लाखांहून अधिक) लोकांची मते शिवसेनेला मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 15.6 टक्के(83 लाख 32 हजारांहून अधिक) लोकांचे मते तर काँग्रेसला 16.1 टक्के( 85 लाख 80 हजारांहून अधिक) लोकांची मते मिळाली आहेत. मात्र या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडे चार लाखांहून अधिक लोकांनी यंदा नोटाला मतदान केले आहे. 

नोटाला मतदान केलेली आत्तापर्यंतची आकडेवारी 

  • दक्षिण मुंबई - 15 हजारांहून अधिक 
  • उत्तर मुंबई - 11 हजारांहून अधिक
  • उत्तर मध्य मुंबई - 10 हजारांहून अधिक 
  • ईशान्य मुंबई - 12 हजारांहून अधिक
  • उत्तर पश्चिम - 17 हजारांहून अधिक
  • दक्षिण मध्य मुंबई - 13 हजारांहून अधिक 
  • पुणे - 10 हजारांहून अधिक
  • रायगड - 11 हजारांहून अधिक
  • ठाणे - 20 हजारांहून अधिक
  • मावळ - 15 हजारांहून अधिक 
  • भिवंडी - 16 हजारांहून अधिक 
  • कल्याण  - 12 हजारांहून अधिक 
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 13 हजारांहून अधिक 

सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि काही निकालांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 350 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही स्वबळावर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने कूच केली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा एकदा दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 85 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 105 जागांवर आघाडीवर आहेत. 
 

Web Title: Maharashtra Lok Sabha Constituency 2019: may people choose voting for NOTA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.