‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:47 PM2019-06-18T12:47:56+5:302019-06-18T12:54:16+5:30

उत्तर प्रदेश दुसºया क्रमांकावर; महाराष्ट्रात ९३ प्रकल्पांत सुरू आहे इथेनॉल निर्मितीचे

Maharashtra first in 'Ethanol' supply | ‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम

‘इथेनॉल’ पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम

Next
ठळक मुद्देदेशभरातील इथेनॉल प्रकल्पांनी १४ मे पर्यंत ३९ टक्के इथेनॉलचा पुरवठा केलामहाराष्टÑातील दोन साखर कारखान्यांनी थेट रसापासून इथेनॉल तयार केलेसंपूर्ण देशभरातून इथेनॉलची निर्मिती होत असली तरी महाराष्ट्र आज तरी देशात प्रथम क्रमांकावर आहे

सोलापूर: साखर उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र इथेनॉल निर्मिती व पुरवठ्यात देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात ९३ प्रकल्पातून इथेनॉल निर्मिती केली जात आहे. दुसºया क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. केंद्र शासनाने इथेनॉल खरेदीचे दर वाढविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना चालना मिळाली आहे.

केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आघाडीचे केंद्रात सरकार असताना इथेनॉल खरेदीदर २७ रुपये इतका होता. फारच कमी दर असल्याने साखर कारखाने व स्वतंत्र इथेनॉल प्रकल्पांना इथेनॉल तयार करणे परवडत नव्हते. त्यामुळे देशभरातील सर्वच इथेनॉल प्रकल्प बंद ठेवावे लागले होते. देशात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल उद्योगासाठी खरेदीदर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात इथेनॉल प्रकल्पांना चालना मिळाली.

महाराष्ट्रत सध्या ९३ प्रकल्पातून इथेनॉल निर्मिती सुरू आहे. देशातच इथेनॉल निर्मितीला वेग आला असून संपर्ण देशात ३२९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम कंपन्यांनी केली होती. प्रत्यक्षात ३१३ कोटींचे टेंडर निघाले. प्रत्यक्षात २६८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल पुरवठादारांना दिले होते. 

यावर्षी देशभरात डिसेंबरनंतर इथेनॉल निर्मितीला वेग आला. १४ मे पर्यंत देशभरात पेट्रोलियम कंपन्यांना १०४ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक इथेनॉल पुरवठा महाराष्ट्रतून झाला असून दुसºया क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. कर्नाटक राज्य ११ कोटी ५३ लाख लिटरचा पुरवठा करून तिसºया क्रमांकावर आहे.

राज्यातील ९३ प्रकल्पांचा ४३ टक्के पुरवठा
देशभरातील २१ राज्यांतील इथेनॉल प्रकल्पांनी यावर्षी इथेनॉल पुरवठ्याच्या निविदा भरल्या होत्या. संपूर्ण देशभरातून इथेनॉलची निर्मिती होत असली तरी महाराष्ट्र आज तरी देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रतील आॅईल कंपन्यांनी ४२ कोटी ६ लाख ४२ हजार लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा काढल्या होत्या. प्रत्यक्षात ८२ कोटी ५ लाख ३९ हजार लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी टेंडर टाकले. महाराष्ट्रतील साखर कारखाने व इथेनॉल प्रकल्पांनी शेजारच्या राज्यातही इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा भरल्या. प्रत्यक्षात ४४ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश मिळाले. राज्यातील ९३ प्रकल्पांनी १४ मे पर्यंत १९ कोटी ६ लाख लिटर म्हणजे ४३ टक्के इथेनॉल पुरवठा केला आहे.

देशभरात ३९ तर उत्तर प्रदेशातून ४० टक्के

  • - देशभरातील इथेनॉल प्रकल्पांनी १४ मे पर्यंत ३९ टक्के इथेनॉलचा पुरवठा केला असून उत्तर प्रदेशातून ४० टक्के इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांनी खरेदी केले आहे. उत्तर प्रदेशातून ४४ लाख ८९ हजार लिटर इथेनॉल पुरवठा होणार असून १८ लाख ४ हजार लिटरचा पुरवठा झाला आहे. 
  • - कर्नाटकातून २९ लाख ४ हजार लिटरचा पुरवठा करावयाचा असून आतापर्यंत ११ लाख ५३ हजार लिटरचा पुरवठा झाला आहे. 
  • - सी. हेव्ही मोलॅसेसपासून तयार होणारे इथेनॉल प्रति लिटर ४३ रुपये ४६ पैसे, बी. हेव्ही मोलॅसेसपासून तयार होणारे इथेनॉल ५२ रुपये ४३ पैसे व थेट रसापासून तयार होणारे इथेनॉल ५९ रुपये १९ पैसे, या दराने खरेदी केली जाते. 

साखर व इथेनॉलच्या विक्रीतून जवळपास सारखेच पैसे येतात. मात्र, सध्या साखरेला उठाव नसल्याने साखर तयार करणारे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. इथेनॉलला मागणी असल्याने पुरवठा केल्यानंतर पैसे मिळतात. महाराष्टÑातील दोन साखर कारखान्यांनी थेट रसापासून इथेनॉल तयार केले आहे.
- महेश देशमुख, संचालक, इस्मा महाराष्ट्र 

Web Title: Maharashtra first in 'Ethanol' supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.