लोकमत निर्विवाद नंबर १, पहिल्या पंधरा वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ वगळता इतर एकही मराठी दैनिक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:29 AM2018-01-20T05:29:10+5:302018-01-20T05:30:24+5:30

‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे नामाभिधान सार्थ ठरवत, चांदा ते बांदा आणि आता देशाच्या राजधानीतील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करणा-या ‘लोकमत’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

Lokmat Undisputable No.1, except for 'Lokmat', there are no other Marathi daily in the first fifteen newspapers | लोकमत निर्विवाद नंबर १, पहिल्या पंधरा वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ वगळता इतर एकही मराठी दैनिक नाही

लोकमत निर्विवाद नंबर १, पहिल्या पंधरा वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ वगळता इतर एकही मराठी दैनिक नाही

googlenewsNext

मुंबई : ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे नामाभिधान सार्थ ठरवत, चांदा ते बांदा आणि आता देशाच्या राजधानीतील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करणा-या ‘लोकमत’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सजग वाचकांच्या भक्कम पाठबळावर ‘लोकमत’ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रात देशात द्वितीय, तर महाराष्ट्रात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. ‘लोकमत’ची वाचकसंख्या तब्बल १ कोटी ८० लाख ६६ हजार झाली असून, निकटच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्राच्या वाचक संख्येपेक्षा ती कितीतरी अधिक आहे.
इंडियन रिडरशिप सर्व्हे (आयआरएस), या नामांकित संस्थेने केलेल्या २०१७ च्या वाचक सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामुळे जगभरातील प्रिंट मीडियावर मंदीचे मळभ आलेले असताना, भारतातील प्रिंट मीडियाने मात्र सर्वांगीण वृद्धीचा आलेख उंचावला आहे. विशेषत: प्रादेशिक वृत्तपत्रांची वाढ लक्षणीय ठरली आहे. मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब अशी की, प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ राज्यात प्रथम आणि देशात दुसºया स्थानी आहे. देशभरातील एकूण (प्रादेशिक वृत्तपत्रांसह) वाचकांची संख्या लक्षात घेता, तिथेही ‘लोकमत’ सहाव्या स्थानी आहे. पहिल्या पंधरा वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’खेरीज अन्य एकही मराठी दैनिक नाही.

पुण्यातही नंबर १
विद्येचे माहेरघर आणि सारस्वतांची नगरी असलेल्या पुण्यातही ‘लोकमत’
प्रथम स्थानीच आहे. ‘आयआरएस’च्या ताज्या सर्वेक्षणाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीची वाचकसंख्या तब्बल
३० लाख ४५ हजारांच्या घरात पोहोचली असून, ‘सकाळ’पेक्षा ती १ लाख ६५ हजारांनी अधिक आहे.

भारतातील १५ सर्वोच्च दैनिकांमध्ये एकमेव ‘लोकमत’चा समावेश, हा तमाम मराठी भाषकांचा सन्मान असून, वाचकांच्या पसंतीवर उमटलेली ही मोहोर आहे. वाचक व जाहिरातदारांनी दाखविलेल्या दृढ विश्वासामुळेच ‘लोकमत’ने हे अग्रस्थान कायम ठेवले आहे. देशातील प्रादेशिक वृत्तपत्रेच नवभारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करत आहेत. वृत्तपत्रांच्या वाढीमध्ये ग्रामीण भागांतील वाचकांचा सिंहाचा वाटा आहे. वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत झालेली ४० टक्के वाढ ही आनंददायी बाब आहे़ सत्याच्या बाजूने उभे राहणाºया पत्रकारितेवर वाचक सर्वाधिक विश्वास ठेवतात, हेच ‘लोकमत’च्या अव्वल स्थानातून सिद्ध झाले आहे. याबद्दल वाचक आणि जाहिरातदारांचे मन:पूर्वक आभार, तसेच ‘लोकमत’ टीमचे अभिनंदन!
- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया ग्रुप

Web Title: Lokmat Undisputable No.1, except for 'Lokmat', there are no other Marathi daily in the first fifteen newspapers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.