LMOTY 2019: कॅन्सरग्रस्त मुलांसाठी सदिच्छादूत बनलेले डॉ. श्रीपाद बाणावली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:49 PM2019-02-20T18:49:46+5:302019-02-20T18:57:54+5:30

अमेरिकेतील लाखो डॉलरच्या पगाराची नोकरी लाथाडून भारतातील गरजू कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार करत त्यांच्यासाठी नवी संजीवनी घेऊन आलेल्या टाटा हॉस्पीटलचे प्रसिद्ध डॉक्टर श्रीपाद बाणावली यांना यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Lokmat Maharashtrian of the Year 2019 Dr Shripad Banavali wins Best Doctor Award in Medical Category | LMOTY 2019: कॅन्सरग्रस्त मुलांसाठी सदिच्छादूत बनलेले डॉ. श्रीपाद बाणावली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

LMOTY 2019: कॅन्सरग्रस्त मुलांसाठी सदिच्छादूत बनलेले डॉ. श्रीपाद बाणावली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

Next

मुंबई : अमेरिकेतील लाखो डॉलरच्या पगाराची नोकरी लाथाडून भारतातील गरजू कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार करत त्यांच्यासाठी नवी संजीवनी घेऊन आलेल्या टाटा हॉस्पीटलचे प्रसिद्ध डॉक्टर श्रीपाद बाणावली यांना यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. श्रीपाद बाणावली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

डॉ. बाणावली यांनी 1997 मध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रीक्स संस्थेतून बी.ई. पीडिएट्रीक्स हेमेटोलॉजी- ऑन्कोलॉजी प्राविण्य मिळविले होते. त्यानंतर त्यांना लहान मुलांच्या कॅन्सरवर उपचार करणाऱ्या जगातल्या सगळ्यात महत्वाच्या 'मेमफेस' सेंट ज्यूड सेंटरमध्ये कायमची काम करण्याची संधी मिळत होती. मात्र, ही संधी नाकारून ते भारतात परतले. कारण एकच उद्देश होता, मायदेशातील रुग्णांची सेवा करायची. 

भारतात आर्थिक परिस्थिती नसल्याने कॅन्सरने त्रस्त असलेल्या लहान मुलांवरील उपचार पालक अर्धवट सोडत होते. 100 मागे जवळपास 55 मुले कॅन्सरमुळे केवळ आर्थिक कारणाने मरण पावत होती. डॉ. बाणावलींच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी यासाठी सरकारी मदत देण्यापासून अनेक उपक्रम राबवले. ज्यामुळे आज 100 पैकी 80 मुले उपचार घेत आहेत. ही गेल्या काही वर्षांतली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये डॉ. श्रीपाद बाणावली हे मेडिकल आणि पिडीयाट्रीक ऑन्कॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. याखेरीज या सेंटरच्या रुरल आऊटरिच प्रोगामचे समन्वयक आहेत. 35 हून अधिक वर्ष ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

गेल्यावर्षी त्यांना जायंट्स ग्रुप्स ऑफ भायखळा या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल एक्सलेन्स इन हेल्थकेअर हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे, लहानग्यांना होणाऱ्या कर्करोगाविषयक उपचारांतील योगदानासाठी सिटी आयकॉन अवॉर्डही त्यांना मिळाले. अमेरिकेतील सोसायटी ऑफ हेमेटोलॉजिक ऑन्कॉलॉजी संस्थेनेही डॉ. बानावली यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाविषयी सन्मानित केले आहे. याखेरीज, डॉ. बानावली यांना संगीत, क्रीडा आणि काव्यक्षेत्राचीही आवड आहे.

हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2019 Dr Shripad Banavali wins Best Doctor Award in Medical Category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.