सगळ्या गुन्हेगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे; सुजय विखे होतायत ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 05:18 PM2019-04-13T17:18:28+5:302019-04-13T17:38:17+5:30

सुजय काँग्रेसमध्ये असतांना त्यांनी अनेकदा भाजपवर जहरी टीका केली होती. सुजय यांचे जुने व्हिडिओ आता वायरल करून विरोधक त्यांना ट्रोल करत आहे. अशा काही जुन्या व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर वायरल होतांना दिसत आहे.

lok sabha election 2019 Sujay vikhe Troll social media | सगळ्या गुन्हेगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे; सुजय विखे होतायत ट्रोल

सगळ्या गुन्हेगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे; सुजय विखे होतायत ट्रोल

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राजकीय पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी सभांचा  धडका लावला आहे. सभेतून एकमेकांवर राजकीय वार केल जात आहे तर दुसरीकडे सोशल मिडियावर सुद्धा एकमेकांना ट्रोल करण्याच्या प्रकार वाढला आहे. जुने व्हिडिओ आणि फोटो वायरल केली जात आहे. अशाच काही वायरल व्हिडिओंमुळे अहमदनगरचे भाजप उमदेवार सुजय विखे यांना सोशल मिडियावर ट्रोल केल जात आहे. 

काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजप मध्ये प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी मिळवली. सुजय काँग्रेसमध्ये असतांना त्यांनी अनेकदा भाजपवर जहरी टीका केली होती. सुजय यांचे जुने व्हिडिओ आता वायरल करून विरोधक त्यांना ट्रोल करत आहे. अशा काही जुन्या व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर वायरल होतांना दिसत आहे.


भाजपमध्ये जाण्यापूर्वी सुजय यांनी लोकमतला दिलेली मुलाखतिचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड वायरल होत आहे. मोदी म्हणाले होते मला पंतप्रधान करा मी १५ लाख रुपये देतो, दिले का त्यांनी. घोषणा करायची सवयच आहे, घोषणाचा पार पाऊस पाडला आहे. प्रशासनाच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजप मध्ये पक्षप्रवेश केले जातात. सगळे गुन्हेगार भाजपमध्ये प्रवेश करत आहे. असे बोलतानाचा सुजय यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल केला जात आहे. 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची निवडणुक चुरशीची समजली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जोर लावत आहे.

Web Title: lok sabha election 2019 Sujay vikhe Troll social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.