राज ठाकरेंचे शिवसेने बाबत मौन का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 03:31 PM2019-04-18T15:31:20+5:302019-04-18T15:45:05+5:30

आपल्या प्रत्येक सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मात्र भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिवसेना बद्दल राज ठाकरे बोलण्यास टाळत आहे.

lok sabha election 2019 Raj Thackeray's silence Shiv Sena | राज ठाकरेंचे शिवसेने बाबत मौन का ?

राज ठाकरेंचे शिवसेने बाबत मौन का ?

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा राज ठाकरेंच्या सभांची आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे सरकारवर हल्ला करत आहे. व्यासपीठावर थेट व्हिडिओ दाखवून सरकारच्या योजनाची राज ठाकरे यांच्याकडून पोलखोल करण्यात येत आहे. राज ठाकरे एकट्या भाजप वर टीका करत असले तरी भाजपसोबत सरकारमध्ये असलेल्या शिवसेनावर राज यांनी मौन राखले आहे.

राज ठाकरेंच्या महाराष्ट्रातील ६ ठिकाणी जाहीर सभा होणारा आहे. राज्यात आतापर्यंत राज यांच्या ४ सभा घेण्यात आल्या आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मात्र भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिवसेना बद्दल राज ठाकरे बोलण्यास टाळत आहे. नांदेड,सोलापूर, कोल्हापूर व सातारा येथील सभेत राज यांनी भाजपची पोलखोल केली. दुसरीकडे मात्र आपल्या सभेत शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंन वर टीका करण्यास राज यांनी टाळले आहे .

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणुक न लढवण्याच्या निर्णय घेतला. मात्र असे असताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राज्यभर प्रचार करायचा निर्णय घेतला. फक्त राज ठाकरेच नाही तर मनसेचे नेते आणि कार्यकर्ते ही स्थानिक पातळीवर भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करताना दिसत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी चर्चा आणि प्रयत्न अनकेदा झाले. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे ज्या भाजप विरोधात सभा घेत आहे त्याच भाजप सोबत शिवसेना सत्तेत असून लोकसभा निवडणुकीत युती केली आहे. त्यामुळे भाजप सरकारला दोष देणारे राज ठाकरे पुण्याच्या सभेत तरी शिवसेना बद्दल बोलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Web Title: lok sabha election 2019 Raj Thackeray's silence Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.