राज ठाकरेंची सोलापूरवारी 'आयपीएल'वर भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:15 AM2019-04-16T11:15:21+5:302019-04-16T11:26:34+5:30

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हायव्होल्टेच सामना सुरू होता. सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियम गच्च भरले होते. मात्र स्टेडिमवर देखील राज ठाकरेंचा बोलबाला पाहिला मिळाला.

Lok Sabha Election 2019: Raj Thackeray Rallies Are Getting Great Response In IPL Fever | राज ठाकरेंची सोलापूरवारी 'आयपीएल'वर भारी

राज ठाकरेंची सोलापूरवारी 'आयपीएल'वर भारी

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचवेळी क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची असलेली आयपीएल स्पर्धा सुरू आहे. तर जागतीक पातळीवर विचार केल्यास 'गेम ऑफ थ्रोन' नावाची वेब सिरीज आली आहे. त्यामुळे देशभरातील लोक आयपीएल आणि वेब सिरीजच्या जगात एवढे व्यस्त असून देशात आणखी काही सुरू आहे, याचं कुणाला काहीच घेण-देणं उरल नसल्याचे चित्र आहे. मात्र राज ठाकरे याला अपवाद ठरले आहेत.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. तसेच भाजपच्या जाहिराती आणि आश्वासनांची राज ठाकरे पुराव्यासहित पोलखोल करताना दिसत आहेत. राज यांची सोमवारी सोलापुरात जाहीर सभा झाली. त्यावेळी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हायव्होल्टेच सामना सुरू होता. सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियम गच्च भरले होते. मात्र स्टेडिमवर देखील राज ठाकरेंचा बोलबाला पाहिला मिळाला.

वानखेडे स्टेडियमवर एक प्रेक्षक समोर सामना सुरू असताना मोबाईलवर राज ठाकरे यांचे भाषण पाहात असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे युवकांना आजही क्रिकेट आणि मनोरंजन या व्यतिरिक्त राज ठाकरे मांडत असलेले विचार अधिक पसंतीस उतरत आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

जीएसटी, नोटबंदी, तरुणांना नोकऱ्या, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी, असे अनेक आश्वासने सरकारने पूर्ण केले नाही. यावरून राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये मोदी सरकारला झोडपून काढले.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Raj Thackeray Rallies Are Getting Great Response In IPL Fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.