प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:01 PM2019-04-20T15:01:14+5:302019-04-20T15:02:16+5:30

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती.

Lok Sabha Election 2019 Priyanka Chaturvedi quit Congress? What is the reason | प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

मुंबई - प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या प्रवक्ते पदासह सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. याआधी त्यांनी पक्षातून कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस सोडण्यामागे वेगळच काऱण असल्याचे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संबंधीत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, दिलगीरी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.

यावर प्रियंका यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस सोडण्याचा निर्णय ट्विटरवरून स्पष्ट केला होता. परंतु, प्रियंका यांनी काँग्रेस सोडण्यामागे आणखी कारण असल्याचे समजते. प्रियंका यांनी राफेलच्या कथीत घोटाळ्यावरून मुथेरत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावरून प्रियंका मथुरेतून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. परंतु, काँग्रेसकडून मथुरेत आधीच महेश पाठक यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर प्रियंका मुंबईतून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र इथे देखील काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि प्रिया दत्त यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. तर मुंबईतून तीन महिला उमेदवार उतरविणे शक्य नव्हते.

दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे मथुरेच्या उमेदवारीचे कारण तत्कालीक असले तरी यामागे राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Web Title: Lok Sabha Election 2019 Priyanka Chaturvedi quit Congress? What is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.