मोदींनी दटावताच सुजय एक पाऊल मागे; राष्ट्रवादीकडून व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 05:38 PM2019-04-12T17:38:19+5:302019-04-12T18:20:49+5:30

विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना उमेदवारी दिली. त्यात भर टाकत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजय यांच्यासाठी नगरमध्ये सभा घेतली. परंतु, या सभेमध्ये एका व्हिडिओ क्लीपमुळे सुजय विखे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

Lok Sabha Election 2019 Modi is angry on Sujay is a step back | मोदींनी दटावताच सुजय एक पाऊल मागे; राष्ट्रवादीकडून व्हिडीओ व्हायरल

मोदींनी दटावताच सुजय एक पाऊल मागे; राष्ट्रवादीकडून व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

मुंबई - नगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्साहात भाजपमध्ये प्रवेश केला. एवढच काय भाजपकडून देखील सुजय यांच्यासाठी पायघड्या घालण्यात आला. तसेच विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना उमेदवारी दिली. त्यात भर टाकत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजय यांच्यासाठी नगरमध्ये सभा घेतली. परंतु, या सभेमध्ये एका व्हिडिओ क्लीपमुळे सुजय विखे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमण होताच, सुजय वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे निघाले होते. तसेच मोदींना क्रॉस करून पुढे जाण्याच्या तयारी ते होते. त्याचवेळी मोदींनी मध्येच थांबून सुजय विखे यांना इशाऱ्यांमध्येच दटावले. त्यानंतर सुजय विखे मागे थबकले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुजय विखे यांना टोला लगावण्यात आला आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. “ पप्पा पंतप्रधान माझ्याकडे रागाने बघतात, परत येऊ का काँग्रेसमध्ये, हुकूमशाहीची सवय लावून घ्या, आता भाजपमध्ये गेल्यावर” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या फेसबुकवर सुजय यांना टोला लगावण्यात आला आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Modi is angry on Sujay is a step back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.