सुप्रिया सुळें संदर्भात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:20 AM2019-05-15T10:20:42+5:302019-05-15T10:24:20+5:30

सुप्रिया सुळेंविषयी फेसबुक अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढले आहे. याबाबतचा व्हिडीओ राष्ट्रावादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

lok sabha election 2019 facebook comment on supriya sule | सुप्रिया सुळें संदर्भात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला चोप

सुप्रिया सुळें संदर्भात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला चोप

googlenewsNext

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बदडल्याची घटना घडली आहे. फेसबुक वरील एका वृत्तवाहिनीच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द तरुणांने वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आणि त्याला चोप देत माफी मागायला लावली.

सोशल मिडीयावरून राजकीय नेतेमंडळी विरोधात आक्षेपार्ह कमेंट करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याआधी, मनसे आणि वंचित बहुजन आघडीच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा, आपल्या नेत्यानविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्यांना चोप दिल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे, कोल्हापुरातील अक्षय तांबवेकर या तरुणाला सुप्रिया सुळेंविषयी फेसबुक अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढले आहे. याबाबतचा व्हिडीओ राष्ट्रावादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

 

ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याविषयीच्या बातमीची पोस्ट संबंधित एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाऊंटवरुन करण्यात आली होती. त्याखाली कमेंटमध्ये अक्षयने सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आणि त्याला जाब विचारले.

यापुढे कोणत्याही महिलेविषयी अपशब्द वापरणार नाही. मी माझं अकाऊंट डिलीट केलं आहे, याबाबत जी कारवाई होईल त्याला मी जबाबदार असेन' असं पत्र त्याच्याकडून लिहून घेतलं.


 

Web Title: lok sabha election 2019 facebook comment on supriya sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.