सैनिकांचा अवमान करणारे मोदींना व्यासपीठावर कसे चालतात : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:07 PM2019-04-17T18:07:06+5:302019-04-17T18:16:15+5:30

शहीद जवानांच्या नावावर मत मागतात. मात्र आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार स्वीकार करतात असा टोला ही धनंजय मुंडे यांनी लगावला. 

lok sabha election 2019 Dhananjay Munde speech narendra modi | सैनिकांचा अवमान करणारे मोदींना व्यासपीठावर कसे चालतात : धनंजय मुंडे

सैनिकांचा अवमान करणारे मोदींना व्यासपीठावर कसे चालतात : धनंजय मुंडे

Next

मुंबई - शहीद जवानांच्या नावावर मते मागणारे पंतप्रधान मोदी यांना आपल्या सभेतील व्यासपीठावर सैनिकांचा अवमान करणारे आमदार कसे चालतात अशी टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. महाआघाडीचे अहमदनगरचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आज जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आयोजित सभेला मुंडे यांनी सवाल उपस्थित केला. 


आपल्या प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांच्या शौर्याचा उल्लेख करत आहे. शहीद जवानांच्या नावावर मत मागतात. मात्र आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार स्वीकार करतात असा टोला ही धनंजय मुंडे यांनी लगावला. सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल अपशब्द बोलणार्‍यांना मोदी व्यासपीठावर कसे घेतात ? याची लाज वाटत नाही का असही धनंजय मुंडे म्हणाले. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या भोसे येतील प्रचारसभेत भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. जवानांबद्दल बेताल वक्तव केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका करण्यात आली होती. परिचारक यांच्यावर दीड वर्षासाठी निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. 

तेच परिचारक आज अकलूज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मांडीला माडी लावून होते. तर पतंप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांचे शौर्य सांगत होते. यावरून मोदींचे देशप्रेम नेमके खरे की खोटे, असा विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: lok sabha election 2019 Dhananjay Munde speech narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.