लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण

By admin | Published: December 23, 2014 03:18 AM2014-12-23T03:18:27+5:302014-12-23T03:18:27+5:30

लोकलच्या दरवाजात लटणाऱ्या ग्रुप्सची दादागिरी प्रवाशांना नेहमीच सहन करावी लागते. असाच एक प्रकार रविवारी रात्री घाटकोपर ते कांजूरमार्गदरम्यानच्या प्रवासात घडला.

Locals stranded in the locality | लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण

लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण

Next

मुंबई : लोकलच्या दरवाजात लटणाऱ्या ग्रुप्सची दादागिरी प्रवाशांना नेहमीच सहन करावी लागते. असाच एक प्रकार रविवारी रात्री घाटकोपर ते कांजूरमार्गदरम्यानच्या प्रवासात घडला. एका प्रवाशाला क्षुल्लक कारणावरून तिघांनी मारहाण केली, मात्र हे सर्व सुरू असताना अन्य प्रवाशांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.
रवी सिंग (२४) याने घाटकोपर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १वरून कांजूरमार्गला जाण्यासाठी रात्री ११च्या सुमारास ट्रेन पकडली. दरवाजाजवळ तीन मित्र उभे होते. रवी यांना त्यांच्यातील एकाने जोरदार धक्का दिला. यावर रवी यांनी तिघांना ‘गिरा दोगे क्या’ असे विचारताच त्यांनी त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. रवी याला वाचविण्यास एकही प्रवासी पुढे आला नाही. रवी हे स्वत:चा बचाव करीत मागेमागे जात असतानाच तीन मित्रांपैकी एकाने सीटवर चढून रवी यांना लातेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याने त्याला मागे खेचले. कांजूरमार्ग आले तरी हा प्रकार सुरूच होता. मारहाण करणारे तिघेही कांजूरमार्ग स्थानकातच उतरले आणि रवीला धमकी देऊ लागले. त्यामुळे घाबरलेल्या रवी याने कांजूरमार्ग स्थानकात न उतरता भांडुपलाच उतरणे पसंत केले.
भांडुप स्थानकात उतरल्यानंतर रवीने तक्रारीसाठी विक्रोळी स्थानक गाठले. मात्र कुर्ला स्थानकात ही तक्रार दाखल होईल, असे रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) सांगण्यात आल्यानंतर त्याने कुर्ला स्थानकात येऊन तक्रार दाखल केली.
कुर्ला रेल्वे पोलीस स्थानकात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
मी कांजूरमार्ग येथे राहतो. त्यामुळे घरी परतण्यासाठी रात्री घाटकोपर स्थानकातून ट्रेन पकडली आणि या ट्रेनमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. मला मारहाण होत असताना डब्यातील एकही प्रवासी मदतीसाठी आला नाही, असे प्रवासी रवी सिंग यांनी सांगितले.

Web Title: Locals stranded in the locality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.