Milk Supply Live Update - स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 07:22 AM2018-07-18T07:22:08+5:302018-07-18T15:17:53+5:30

दूध प्रश्नावर तोडगा नाहीच, केंद्र आणि राज्य सरकारच्या बैठका निष्फळ

Live Update milk dairy farmers went on strike | Milk Supply Live Update - स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

Milk Supply Live Update - स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

Next

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिलीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेलं आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवलं आहे. दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली आणि नागपुरात बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या दालनात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत दूध दरावर कुठलाही तोडगा निघाला नाही.

LIVE UPDATES - 

- कवठेमहाकाळ येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांच्या वैजयंत व शेजाळ अॅग्रो येथे चोरून दूध संकलन होत असताना रोखले आणि दूध वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन शहरात चौकाचौकात दूध ओतलं.

- जालना : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे 4 टँकर अडवले, टँकरमधील 4 हजार लिटर दूध रस्त्यावर सांडले

- पुणे : अमूलचं दूध महाराष्ट्रात आणण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, दूध आंदोलनात राज्य सरकार दोषी - राज ठाकरे

- वाशिममध्ये पोलीस बंदोबस्तात दुधाची वाहतूक

- सोलापूर - शेळवे येथील तुकाराम सोपान गाजरे या शेतकऱ्याने शेततळ्यात दूध ओतले

- स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार, उद्यापासून जनावरांसोबत महामार्ग रोखणार, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

- सोलापूर - बेगमपुर येथील नेचर डिलायटचे दुध संकलन केंद्र फोडले, 20 हजार लिटर दुधाच्या टाक्या रिकाम्या

- खा. राजू शेट्टी अजूनही पालघरला ठाण मांडून, गुजरातहून येणारं दूध रोखण्यासाठी आंदोलन

- कोल्हापूर - शिरोळ येथे जनतारा शाळेजवळ आंदोलनकर्त्यांनी २० दूधाचे कॅन रस्त्यावर ओतले

- कोल्हापुरात दूध आंदोलनाला हिंसक वळण, जयसिंगपुरात गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवला.

- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघाला नाही.

- आंदोलन कायम राहिल्यास गुरुवारपासून मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दुधाच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार.

- मुंबईतील दूध संकलन निम्म्यावर आल्याने, मागणीच्या तुलनेत काही प्रमाणात तुटवडा जाणवणार.

- स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई-अहमदाबाद राज्य महामार्गावरील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भिलाड येथे गुजरातवरून दूध घेऊन मुंबईकडे निघालेले 50 टँकर अडवून ठेवले

Web Title: Live Update milk dairy farmers went on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.