Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 03:45 PM2018-11-27T15:45:56+5:302018-11-27T16:08:38+5:30

सरकार म्हणते चर्चा करायची...चर्चा करायची...कसली चर्चा करायची आहे, सरकारला. कर्जमाफी फसवी...मराठा, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे...आधी अहवाल सदनात ठेवा...तेव्हाच सभागृह चालू देवू.

The Leader of the Opposition in the Legislative Council, Dhananjay Munde speech in Vidhan Parishad on Maratha Reservation Issue | Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे 

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप – धनंजय मुंडे 

googlenewsNext
ठळक मुद्देमराठा, धनगर समाजाचे सरकारकडे आलेले अहवाल सदनात ठेवा. मुस्लिम आरक्षणाचे विधेयक आले पाहिजेदुष्काळावर चर्चा काय करायची? तुमच्या फसव्या घोषणा ऐकायला का ?

मुंबई : सरकार म्हणते चर्चा करायची...चर्चा करायची...कसली चर्चा करायची आहे, सरकारला. कर्जमाफी फसवी...मराठा, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे...आधी अहवाल सदनात ठेवा...तेव्हाच सभागृह चालू देवू असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिला.

मराठा, धनगर समाजाचे सरकारकडे आलेले अहवाल सदनात ठेवा. दुष्काळग्रस्तांना त्वरीत मदत द्या, या गंभीर विषयावर सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याने गेले दोन आठवडे अधिवेशनाचे कामकाज विरोधी सदस्य बंद पाडत आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही मराठा समाजाला मागास आयोगाचा अहवाल आणि धनगर समाजाला दिलेला टीसचा अहवाल सदनाच्या पटलावर ठेवावा या मागणीसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सभागृह दणाणून सोडले आहे.

आज दुसऱ्यादिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारचे आरक्षण द्यायचं की नाही हे स्पष्ट धोरण नाही. या सदनामध्ये आरक्षणाचे विधेयक आले पाहिजे. टीसचा अहवाल का लपवून ठेवता असा सवाल करतानाच धनगर आरक्षणाचा ठराव करावा. मुस्लिम आरक्षणाचे विधेयक आले पाहिजे. या सर्व सुरुवातीपासून मागण्या करत आलो आहोत. मागास आयोग, टीसचा अहवाल ठेवा त्याशिवाय सदनाचे काम काही होणार नाही अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली.

दुष्काळावर चर्चा काय करायची? तुमच्या फसव्या घोषणा ऐकायला का ? असा सवाल करत  बोंड अळीची 100 % नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा नाहीतर राजीनामा द्या, नाहीतर मी देईल असे आव्हान त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

Web Title: The Leader of the Opposition in the Legislative Council, Dhananjay Munde speech in Vidhan Parishad on Maratha Reservation Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.