लातूरमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, आरोपी फरार

By admin | Published: July 16, 2017 11:22 PM2017-07-16T23:22:02+5:302017-07-16T23:22:02+5:30

आॅटोरिक्षाने घरी निघालेल्या एका महिलेला तिघांनी बळजबरीने शहराबाहेर नेवून अत्याचार केल्याची घटना 13 जुलै रोजी सायंकाळी

In Latur gang violence at a woman, the accused absconded | लातूरमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, आरोपी फरार

लातूरमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, आरोपी फरार

Next
>ऑनलाइन लोकमत
उदगीर (जि.लातूर), दि. 16 - आॅटोरिक्षाने घरी निघालेल्या एका महिलेला तिघांनी बळजबरीने शहराबाहेर नेवून अत्याचार केल्याची घटना 13 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना केली आहेत. दरम्यान पीडित महिलेवर लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
उदगीर शहरातील एक महिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी 13 जुलै रोजी गेली होती. दरम्यान सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ती घराकडे जाण्यासाठी आॅटोरिक्षाची वाट पाहात थांबली होती. या आॅटोत तीन अनोळखी व्यक्ती आॅटोरिक्षात बसले होते. सदर महिलेचे या व्यक्तींनी तोंड दाबून शेल्हाळ रोड परिसरात घेऊन गेले. तेथे या नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडित महिला बेशुद्धावस्थेत विव्हळत पडलेली एका नागरिकाने पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांना या बाबतची माहिती दिली. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक भिमाशंकर हिरमुखे, पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पोलीस कर्मचाºयांनी तिला लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या जबाबावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून उदगीर शहर पोलीस आरोपींचा शोध लागलेला नाही.
 
दोन पथके नियुक्त-
उदगीर शहरात एका महिलेवर सामूहिक अत्याचार करणाºया आरोपींच्या अटकेसाठी दोन पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहेत. हे दोन्ही पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाली आहेत. घटनेच्या तिसºया दिवशीही आरोपींचा पोलिसांना शोध लागला नाही.
 

Web Title: In Latur gang violence at a woman, the accused absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.