कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:32 AM2018-06-15T06:32:59+5:302018-06-15T06:32:59+5:30

कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही फेºया सुरळीत आहेत. खासगी कंपनीच्या काही चालकांनी बुधवारी काम बंद केले होते.

Konkan to Mumbai, Shiva Shastri is Start, ST corporation claims | कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा

कोकणातून मुंबईत येणारी शिवशाही सुरू, एसटी महामंडळाचा दावा

Next

मुंबई - कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही फेºया सुरळीत आहेत. खासगी कंपनीच्या काही चालकांनी बुधवारी काम बंद केले होते. तथापि याचा कोणताही परिणाम गुरुवारी झाला नसल्याने सर्व शिवशाहीच्या फेºया वक्तशीरपणे असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
खासगी कंपनीच्या बिलिंगबाबत तक्रारी नसून महामंडळ आणि कंपनी यांच्यात समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता तो दूर झाला आहे. त्याचबरोबर कराराप्रमाणे वातानुकूलित बस अ‍ॅव्हरेजच्या समस्येबाबत संबंधित कंपनीच्या मालकांशी बोलून प्रश्न सोडवण्यात येईल. गुरुवारी कोकणातून मुंबईकडे येणारी शिवशाहीची वाहतूक सुरळीत होती, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंग देओल यांनी
सांगितले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सात खासगी कंपनीच्या शिवशाहींचा समावेश आहे. यापैकी श्री कृपा कंपनीच्या चालकांनी दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचे सांगत बुधवारी संप पुकारला
होता.
यामुळे बुधवारी दुपारी रत्नागिरी, खेड, गुहागर येथून मुंबईकडे येणाºया शिवशाही रद्द करण्यात आल्या
होत्या. मात्र कोकणातून मुंबईत येणाºया शिवशाहीच्या फेºया
सुरळीत सुरू होत्या, या फेºयांवर चालकांच्या काम बंदचा परिणाम झाला नसल्याचो महामंडळाने स्पष्ट केले.
 

Web Title: Konkan to Mumbai, Shiva Shastri is Start, ST corporation claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.