Kishor's rare issue online! Child rights initiative; 30 thousand leaf childhood | ‘किशोर’चे दुर्मीळ अंक आॅनलाइन! बालभारतीचा उपक्रम; ३० हजार पानांचे बालसाहित्य

 पुणे : बालभारतीकडून प्रकाशित होणाºया व गेली ४७ वर्षे मुला-मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया किशोर मासिकाच्या १९७१ पासूनच्या अनेक दुर्मीळ अंकांचा खजिना बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेल्या ५५१ अंकांच्या ३० हजार पानांचे बालसाहित्य डिजिटलायजेशन करून आॅनलाइन उपलब्ध करण्यात आले आहे.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात याचे नुकतेच लोर्कापण करण्यात आले आहे.
बालभारतीकडून १९७१ साली ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘किशोर’ मासिक सुरू करण्यात
आले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्यावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक सुरू करण्यात आले.
अल्पावधीतच गुणवत्तेच्या जोरावर किशोर मासिकाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. सध्या राज्यात ‘किशोर’चे ८० हजार वर्गणीदार आहेत.

जुन्या अंकांची वाचकांकडून सातत्याने मागणी होत होती. डिजिटलायझेशनमुळे हा दुर्मीळ खजिना आॅनलाइन मोफत उपलब्ध झाला आहे.
- किरण केंद्रे, कार्यकारी संपादक (किशोर), बालभारती.