केईएममध्‍ये निर्भया सेंटर तीन महिन्‍यात कार्यान्‍वयीत करणार, मुख्‍यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:20 PM2017-12-19T16:20:57+5:302017-12-19T16:23:41+5:30

पीडित महिलांना तातडीने वैद्यकीय व अन्‍य सर्व मदत मिळावी म्‍हणून आवश्‍यक असणारे निर्भया सेंटर केईएममध्‍ये येत्‍या तीन महिन्‍यात कार्यान्‍वयीत करण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी आज विधानसभेत केली.

In the KEM, the Nirbhaya Center will be implemented in three months, the Chief Minister's announcement in the Legislative Assembly | केईएममध्‍ये निर्भया सेंटर तीन महिन्‍यात कार्यान्‍वयीत करणार, मुख्‍यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

केईएममध्‍ये निर्भया सेंटर तीन महिन्‍यात कार्यान्‍वयीत करणार, मुख्‍यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Next

नागपूर - पीडित महिलांना तातडीने वैद्यकीय व अन्‍य सर्व मदत मिळावी म्‍हणून आवश्‍यक असणारे निर्भया सेंटर केईएममध्‍ये येत्‍या तीन महिन्‍यात कार्यान्‍वयीत करण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी आज विधानसभेत केली. मालाड पुर्व येथे अल्‍पवयीन गतीमंद मुलीचे अपहरण केल्‍याचा तारांकित प्रश्‍न विधानसभेत चर्चेला आला होता. यावेळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी निर्भया सेंटरचा विषय चर्चेत आणला. दिल्‍ली येथे निर्भयावर बलात्‍काराची घटना घडल्‍यानंतर केंद्र सरकारने निर्भया निधीची स्‍थापना करून अशा बलात्‍कार आणि अन्‍य दुर्दवै घटनेत बळी पडलेल्‍या महिलांना आवश्‍यक असणारे निर्भया सेंटर सुरू करण्‍याची योजना आणली होती. त्‍यासाठी अर्थसंकल्‍पात तरतूदही केली होती. अशा प्रकारचे एक सेंटर मुंबईत केईएम रूग्‍णालयात सुरू करण्‍यात यावे अशी मागणी करीत याचा पोलिस, महापालिका यांच्‍याकडे गेली दीड वर्षे पाठपुरावा सुरू केला आहे. पिडीत महिलेला कायदेशीर व वैद्यकीय मार्गदर्शन आणि पुरावे गोळा करण्‍याठीची मदत करणे, तसेच तीला मानसिक आधार देणे तीला योग्‍य वेळी योग्‍य उपचार मिळणे अशा प्रकारची मदत देणारे हे सेंटर असावे अशी ही संकल्‍पना आहे. याबाबत मागिल अधिवेशनातही आमदार अॅड आशिष शेलार यांनी चर्चा घडवून आणली होती. त्‍यानंतर आज पुन्‍हा आमदार अॅड. शेलार यांनी विधानसभेत प्रश्‍न विचारून याकडे मुख्‍यमंत्र्यांचे लक्ष वेधले. दरम्‍यान, या प्रश्‍नाला उत्‍तर देताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे सेंटर सुरू करण्‍याची कार्यवाही तातडीने सुरू करण्‍यात येईल. त्‍यासाठी आवश्‍यक त्‍या परवानग्या एक महिन्‍यात देण्‍यात येतील. हे सेंटर तीन महिन्‍यात कार्यान्‍वयीत करण्‍यात येईल, अशी ग्‍वाही दिली.

Web Title: In the KEM, the Nirbhaya Center will be implemented in three months, the Chief Minister's announcement in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.