कोरेगाव-भीमा घटनेचे पडसाद ; मुंबई, राज्यात तणावपूर्ण शांतता, प्रकाश आंबेडकरांची आज महाराष्ट्र बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:02 AM2018-01-03T06:02:22+5:302018-01-03T06:03:44+5:30

कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात उमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले.

 Karegaon-Bhima crisis; Stressful peace in the state of Mumbai, Mumbai | कोरेगाव-भीमा घटनेचे पडसाद ; मुंबई, राज्यात तणावपूर्ण शांतता, प्रकाश आंबेडकरांची आज महाराष्ट्र बंदची हाक

कोरेगाव-भीमा घटनेचे पडसाद ; मुंबई, राज्यात तणावपूर्ण शांतता, प्रकाश आंबेडकरांची आज महाराष्ट्र बंदची हाक

Next

मुंबई - कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात उमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत विविध भागांत रास्ता रोको करण्यात आले. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात आंदोलनादरम्यान बेस्ट बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. पूर्व उपनगरातील
रस्ते वाहतुकीला आंदोलनाचा मोठा
फटका बसला. त्यामुळे चक्का जाम
झाला होता. दुसरीकडे हार्बर रेल्वेमार्गावर दुपारच्या सुमारास चेंबूर येथे करण्यात आलेल्या रेल रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली
होती. मुख्यमंत्र्यांसह सर्वच प्रमुख
नेत्यांनी शांततेचे आवाहन केल्याने तणाव निवळत गेला.
मंगळवारी सकाळीच मुंबईच्या पूर्व उपनगरात कुर्ला, मुलुंड, चेंबूर आणि गोवंडीसह लगतच्या परिसरात भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करणे सुरू झाले. ठिकठिकाणी दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळाही लवकर सोडण्यात आल्या. विशेषत:
रेल्वे स्थानके आणि बस स्थानके
परिसरात तणावपूर्ण स्थिती होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदत
हिंसाचारात झालेल्या एका मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. या शिवाय, ज्यांच्या वाहनांची तोडफोड झालेली आहे, त्यांना नुकसानभरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

भिडे, एकबोटे यांच्यावर गुन्हा : सामाजिक कार्यकर्त्या अनिता साळवे यांच्या तक्रारीनंतर शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव जमविणे व असंघटित गुन्हेगारी आदी कलमान्वये पिंपरीत गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशी करा : आठवले
अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी लाखो कार्यकर्ते येतात, पण अनुचित प्रकार घडला नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

हार्बर रेल्वे ठप्प

मुलुंड आणि गोरेगाव येथे राजकीय पक्षांचे मोर्चे, हार्बर रेल्वे चेंबूरच्या रेल रोकोमुळे पूर्णत: ठप्प, चेंबूर, घाटकोपर आंदोलनकर्त्यांचे बनले प्रमुख केंद्र, चेंबूर, गोवंडी परिसरात तणावपूर्ण शांतता, दादर-हिंदमाता परिसरातही दुकानांना कुलुपे, बेस्टच्या सुमारे २० बेस्ट बसेसचे नुकसान, पोलिसांकडून शंभरहून अधिक आंदोलनकर्त्यांवर कारवाई.

मुलुंड आणि गोरेगाव येथे राजकीय पक्षांनी मोर्चे काढत स्थानिक पोलिसांना आपले निवेदन दिले. हार्बर रेल्वेमार्गावर दुपारच्या सुमारास चेंबूर येथे करण्यात आलेल्या रेल रोकोमुळे हा मार्ग पूर्णत: ठप्प झाला होता.
सायन आणि ठाणे शहराला जोडणारा लाल बहादूर शास्त्री मार्गही पूर्णत: ठप्प झाला होता. चेंबूर आणि गोवंडी परिसरात तणावपूर्ण शांतता होती. दादर-हिंदमाता परिसरातही तणावपूर्ण शांतता होती.

पवारांनी ठेवला प्रशासनावर ठपका
भीमा-कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे झाल्यानिमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, याची प्रशासनाला कल्पना असतानाही खबरदारी घेण्यात आली नाही. याचा गैरफायदा घेण्यास काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन काही दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगतात. लोकांनी कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता, योग्य प्रकारे ही स्थिती हाताळणे आवश्यक आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Web Title:  Karegaon-Bhima crisis; Stressful peace in the state of Mumbai, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.