नाशिकमध्ये कन्हैया कुमारची सभा; कडेकोट पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 02:00 PM2017-11-05T14:00:01+5:302017-11-05T15:09:03+5:30

स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार आज दुपारी साडेचार वाजता नाशिकमध्ये येणार असून छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कु मार यांच्या सभेचे आयोजन केले आहे.

Kanhaiya Kumar's meeting in Nashik this afternoon; Tight police settlement | नाशिकमध्ये कन्हैया कुमारची सभा; कडेकोट पोलीस बंदोबस्त

नाशिकमध्ये कन्हैया कुमारची सभा; कडेकोट पोलीस बंदोबस्त

Next
ठळक मुद्देपोलिसांनी एखाद्या ‘व्ही.व्हीआयपी’च्या सभेप्रमाणे नियमावली आखून दिली प्रवेशद्वारावर धातुशोधक यंत्रासह ‘प्रवेश कमान’ व्यासपिठावरील खुर्च्या वगळता सभेत खुर्च्या ठेवण्यास प्रतिबंध

नाशिक : स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार आज दुपारी साडेचार वाजता नाशिकमध्ये येणार असून छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कु मार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या ठिकाणी येणाºया विद्यार्थी कार्यकर्त्यांना वाहने आणण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. सभेसाठी वाहनतळ जवळच्या पाचशे मीटर अंतरावरील ईदगाह मैदान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी एखाद्या ‘व्ही.व्हीआयपी’च्या सभेप्रमाणे नियमावली आखून दिली आहे.

 

सभा मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्ग बसस्थानकाला लागून असलेल्या तुपसाखरे लॉन्स येथे होणार आहे. लॉन्समध्ये कु ठल्याही प्रकारच्या खुर्च्यांचा वापर सभेला आलेल्या कार्यकर्त्यांना करता येणार नाही. व्यासपिठावरील खुर्च्या वगळता सभेत खुर्च्या ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रवेशद्वारावर धातुशोधक यंत्रासह ‘प्रवेश कमान’ लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी सभेच्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीपासून तर कुठल्याहीप्रकारे खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात आली आहे. सभेला येताना कुठल्याहीप्रकारचे काळे कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही संघटनेचा सदस्य व कार्यकर्ता सांगून बंदोबस्तावरील पोलिसांवर दबाव आणू नये. तपासणीसाठी प्रवेशद्वारावर पोलिसांना सहकार्य करावे. 


कु ठल्याहीप्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. अशा नियमावलीचे फलक प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे.
सभेच्या ठिकाणी दुपारी साडेचार वाजतान कन्हैया कुमार यांचे आगमन होणार आहे. 

Web Title: Kanhaiya Kumar's meeting in Nashik this afternoon; Tight police settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.