चित्रपट ‘सेन्सॉर’ संमत झाल्यानंतर वादंग घालणे चुकीचे : मधुर भांडारकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 08:29 PM2019-07-19T20:29:34+5:302019-07-19T20:29:54+5:30

एकदा चित्रपट सेन्सॉर संमत झाला की तो सोडून द्यावा. कोणत्याही पद्धतीने वादंग होणं हे दुर्दैवी आहे..

It is wrong to debate after the movie 'Sensor' is passed: Madhur Bhandarkar | चित्रपट ‘सेन्सॉर’ संमत झाल्यानंतर वादंग घालणे चुकीचे : मधुर भांडारकर

चित्रपट ‘सेन्सॉर’ संमत झाल्यानंतर वादंग घालणे चुकीचे : मधुर भांडारकर

Next
ठळक मुद्दे ‘इंदू सरकार’ हा चित्रपट जतन करण्यासाठी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त

पुणे :  सेन्सॉर बोर्डाने एखाद्या चित्रपटाला जर परवानगी दिली असेल तर त्यावर वादंग निर्माण करणे चुकीचे आहे. एकदा चित्रपट सेन्सॉर संमत झाला की तो सोडून द्यावा. कोणत्याही पद्धतीने वादंग होणं हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर यांनी चित्रपटांवरून वादंग निर्माण करणाऱ्यांवर टीका केली. मात्र जेव्हा काही चित्रपटांबददल असे वादंग निर्माण झाले. त्या निर्मात्यांच्या बाजूने मी उभा राहिलो. पण  ‘इंदू सरकार’च्या वेळी वादाला तोंड फुटले. तेव्हा माझ्या बाजूने कुणी उभे राहिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मधुर भांडारकर यांनी 2017 साली दिग्दर्शित आणि सहनिर्मित केलेल्या ‘ इंदू सरकार’ या राजकीय चित्रपटाची  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात शुक्रवारी भर पडली. भांडारकर यांनी  ‘ चांदनी बार’,  पेज थ्री’,‘कॉर्पोरेट’, ‘ट्रँफिक सिग्नल’,‘फँशन’ या चित्रपटानंतर  ‘इंदू सरकार’ हा चित्रपट जतन करण्यासाठी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त केला. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे वादंग निर्माण झाला होता. या चित्रपटात 1975 च्या आणीबाणीच्या काळामधील चित्रण दाखविताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांना चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आले आहे असा आक्षेप कॉंग्रेस समर्थकांनी घेतला होता. कोणत्याही चित्रपटांवरून निर्माण होणा-या वादंगासंदर्भात  मधुर भांडारकर यांना पत्रकारांनी विचारले असता ’चित्रपट सेन्सॉर संमत झाल्यास त्यावर वाद घालणं चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितलं. हा चित्रपट संग्रहालयाकडे देताना आनंद होत आहे.  आजपर्यंत सगळे चित्रपट सामाजिक प्रश्न डोळ्यासमोर ठेवूनच निर्माण केल्याने रसिक त्याच्याशी आपोआप रिलेट होऊ शकले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------------------------------------------------------------
इफ्फीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरे होणार; एफटीआयआयचे विद्यार्थी सहभागी करून घेणार 
देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या  ‘गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ (इफ्फी) चे यंदाचे  सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष दणक्यात साजरे केले जाणार असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या इफ्फीमध्ये विद्यार्थी विभाग बंद करण्यात आला. एफटीआयआयच्या विद्याथर््यांना इफ्फीपासून दूर ठेवण्यात आले. त्याच एफटीआयआयच्या विद्याथर््यांना यंदा व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतले जाणार असल्याचे इफ्फीच्या मुख्य आयोजन समितीचे सदस्य मधुर भांडारकर यांनी सांगितले. तसेच इफ्फीसाठी काही चित्रपटगृह वाढविण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: It is wrong to debate after the movie 'Sensor' is passed: Madhur Bhandarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.