मनसे अजेंडय़ावर पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा

By Admin | Published: July 26, 2014 11:02 PM2014-07-26T23:02:37+5:302014-07-26T23:02:37+5:30

लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही जागेवर विजय न मिळवणारी मनसे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागी झाली आहे.

The issue of reclaiming MNS Ajenday again | मनसे अजेंडय़ावर पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा

मनसे अजेंडय़ावर पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा

googlenewsNext
ठाणो : लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही जागेवर विजय न मिळवणारी मनसे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागी झाली आहे. महत्त्वाची ठिकाणो आणि फुटपाथ व्यापणा:या  फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई न केल्यास मनसे स्टाइलने कारवाई करण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. याशिवाय, सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणा:या रिक्षाचालकांनादेखील धडा शिकवण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. 
ठाण्यात ढेपाळलेल्या पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षाच्या पदाधिका:यांच्या वतीने अनेक प्रयत्न झाले आहेत. परंतु, पक्षातच असलेली अंतर्गत गटबाजी यामुळे मनसेचा नारा ठाण्यात प्रत्येक वेळी फोल ठरत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणो जिलतदेखील मनसेला एकाही जागेवर विजय मिळवणो सोडाच, परंतु डिपॉङिाटही वाचवता आले नाही. आता विधानसभेचे पडघम वाजू लागताच ठाणो शहरातील महत्त्वाचे विषय घेऊन मनसे रिंगणात उतरली आहे. फेरीवाल्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात फेरीवाल्यांवर कोणत्या निकषांच्या अनुषंगाने कारवाई करता येईल, हे अतिशय स्पष्टपणो नमूद केले आहे. असे असतानाही महापालिका मात्र फेरीवाल्यांवर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांआड येणा:या अशा फेरीवाल्यांवर मनसे महापालिकेला कारवाई करण्यास भाग पाडेल आणि पालिकेने तसे न केल्यास नागरिकांसाठी अशा फेरीवाल्यांवर मनसे स्वत: कारवाई करेल, असा इशारा मनसेला दिला आहे. 
 भाडे नाकारणा:या, प्रवाशांशी अरेरावी करणा:या, वाहतुकीचे नियम मोडणा:या रिक्षाचालकांविरोधात वेळ पडल्यास योग्य त्या  पद्धतीने 
त्याच ठिकाणी धडा शिकवण्यात येईल.  रिक्षा स्टॅण्डच्या ठिकाणी नागरिकांनी त्यांच्या तक्रारी थेट  18क्क्225335 या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांकावर कराव्यात, यासाठी जनजागृती करण्यात येईल, असेही मनसेच्या वतीने एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The issue of reclaiming MNS Ajenday again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.