मोबाईल ऐवजी निघाला भुसा, पोस्टमनवरच काढला राग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:04 AM2018-11-18T01:04:33+5:302018-11-18T01:06:02+5:30

येथील पियुष घनश्याम मंधवानी (१९) याने आॅनलाईन मोबाईल बुकिंग केली होती. शनिवारी दुपारी मू. जे. महाविद्यालय परिसर शाखेचे पोस्टमन चंद्रशेखर रामदास जगताप (५०) हे पार्सल घेऊन पियुषच्या घरी गेले.

Instead of mobile phone, Removed anger!to the postman! | मोबाईल ऐवजी निघाला भुसा, पोस्टमनवरच काढला राग!

मोबाईल ऐवजी निघाला भुसा, पोस्टमनवरच काढला राग!

Next

जळगाव : आॅनलाईन बुकींग करुन तरुणाने मोबाईल मागविला, मात्र प्रत्यक्षात हातात मोबाईल ऐवजी भुसा व पितळी यंत्र पडले. फसवणूक झाल्याच्या संतापात तरुणाने पार्सल घेऊन येणाऱ्या पोस्टमनलाच मारहाण केली. त्याला दिलेले ४ हजार १०० रुपयेही हिसकावून घेतले.
येथील पियुष घनश्याम मंधवानी (१९) याने आॅनलाईन मोबाईल बुकिंग केली होती. शनिवारी दुपारी मू. जे. महाविद्यालय परिसर शाखेचे पोस्टमन चंद्रशेखर रामदास जगताप (५०) हे पार्सल घेऊन पियुषच्या घरी गेले.
पार्सल हातात पडल्यानंतर जगताप यांनी पियुषची सही घेऊन ४ हजार १०० रुपये घेत तेथून निघाले. पियुषने पार्सल उघडल्यानंतर त्यात भुसा व पितळी मूर्ती निघाल्या. पियुषने इमारतीच्या खाली येऊन पोस्टमनला पुन्हा घरी बोलावले.
गुन्हा दाखल करण्याची तयारी केल्यानंतर पियुषच्या वडिलांनी पोस्टमनची माफी मागितली, इतकेच नव्हे पियुषला पाय धरुन माफी मागायला लावली. विद्यार्थी असल्याने जगताप यांनी गुन्हा दाखल करणे टाळले.

हात पिरगळला
जगताप घरी आल्यानंतर त्यांच्या हातातील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. जगताप यांनी ही आमची चूक नाही, ते संबंधित कंपनीचे काम आहे, असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. पियुषने त्यांचा हात पिरगळून जबरदस्तीने पैसे काढले व मारहाण करुन हाकलून लावले.

Web Title: Instead of mobile phone, Removed anger!to the postman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल