मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी प्रस्ताव पाठवावे - पांडुरंग फुंडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 08:21 PM2017-11-23T20:21:28+5:302017-11-23T20:23:56+5:30

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक अथवा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.

Industries should send proposals to take advantage of the Chief Minister's Agriculture and Food Processing Scheme - Pandurang Phundkar | मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी प्रस्ताव पाठवावे - पांडुरंग फुंडकर

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी प्रस्ताव पाठवावे - पांडुरंग फुंडकर

Next
ठळक मुद्दे 'मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना 2017' उद्योजकांनी आपले प्रस्ताव सादर करावेत.राज्याचे अन्न प्रक्रिया धोरणही 4 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक अथवा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.

फुंडकर म्हणाले की, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना 2017' ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्याचे अन्न प्रक्रिया धोरणही 4 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी आपले प्रस्ताव जिल्हा कृषी अधिकारी किंवा अधीक्षक यांच्याकडे सादर करावेत.

टोमॅटो, मनुका, काजू, हळद, मिरची, मिनी डाळमिल, मिनी तांदूळ मिल इत्त्यादी व्यवसायमध्ये प्रक्रिया करण्यासाठी उद्योगांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करावे,असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी केले आहे.

Web Title: Industries should send proposals to take advantage of the Chief Minister's Agriculture and Food Processing Scheme - Pandurang Phundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.