जळगावात भाज्यांमध्ये तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 09:08 AM2018-10-05T09:08:00+5:302018-10-05T09:08:00+5:30

फळे,भाजीपाला : जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्यापर्यंत चांगली होती. मात्र चार-पाच दिवसांपासून भाज्यांची आवक कमी झाली.  

Increase in vegetables in Jalgaon | जळगावात भाज्यांमध्ये तेजी

जळगावात भाज्यांमध्ये तेजी

Next

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक काहींशी कमी झाली. पितृपक्षामुळे त्यांच्या भावातही वाढ झाली.  जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्यापर्यंत चांगली होती. मात्र चार-पाच दिवसांपासून भाज्यांची आवक कमी झाली. त्यात पितृपक्षामध्ये लागणाऱ्या गंगाफळ, चवळीच्या शेंगा, गवारच्या शेंगा यांच्या भावात वाढ झाली. गेल्या आठवड्यात ४०० ते ८०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या गंगाफळचे भाव ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटल झाले. चवळीच्या शेंगामध्येही थेट ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ३५०० रुपये झाली. गवारच्या शेंगातही २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन गवार ३२०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचली. बटाट्याच्या भावातही या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ते १६०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.

Web Title: Increase in vegetables in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.