पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीचे कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरू - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:48 AM2017-11-12T00:48:12+5:302017-11-12T00:48:38+5:30

शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती माजी केंद्रीयमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.

If you do not forgive long-term debt along with crop loans, come on the road - Sharad Pawar | पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीचे कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरू - शरद पवार

पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीचे कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरू - शरद पवार

Next

नाशिक : शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती माजी केंद्रीयमंत्री व राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.
नाशिकजवळील मोहाडी (दिंडोरी) येथे सह्याद्री फार्मवर शेतकºयांसमवेत केंद्रीय कृषी सचिवांचा संवाद कार्यक्रम शरद पवार यांच्या पुढाकाराने झाला. ते म्हणाले, आपण केलेल्या ७१ हजार कोेटींच्या कर्जमाफीबाबत त्यावेळी एकही तक्रार नव्हती. आताच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत गोंधळ आहे. काही शेतकºयांना तीस तीस रुपये कर्जमाफी दिली आहे. ही शेतकºयांची टिंगलटवाळी सुरू आहे.

‘शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्षमता वृद्धीसाठी कटिबद्ध’
राष्ट्रवादी फलोेत्पादन अभियान आणि राष्ट्रवादी फलोत्पादन मंडळ यांच्यात समन्वय साधण्याचा केंद्राचे कृषी खाते प्रयत्न करणार आहे. त्यातून फामर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या (एफपीओ) क्षमता वृद्धीसाठी केंद्र सरकार आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासन केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनाईक यांनी दिले. नाशिकसह राज्यातील निर्यातदार व शेतमाल उत्पादकांनी त्यांच्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या.

Web Title: If you do not forgive long-term debt along with crop loans, come on the road - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.