लोकमत प्रोफेशनल आयकॉन्स ऑफ विदर्भ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 09:15 PM2018-02-22T21:15:53+5:302018-02-22T23:08:06+5:30

लोकमत प्रोफेशनल्स आयकॉन्स ऑफ विदर्भ  या  विशेष समारंभात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे चेअरमन स्वामी बाबा रामदेव आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. 

If you do not break the laws of God and the country's constitution, then nobody can do anything - Baba Ramdev | लोकमत प्रोफेशनल आयकॉन्स ऑफ विदर्भ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

लोकमत प्रोफेशनल आयकॉन्स ऑफ विदर्भ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Next

नागपूर - विदर्भातील कर्तुत्ववान व्यक्तींचा गौरव करणारा लोकमत प्रोफेशनल्स आयकॉन्स ऑफ विदर्भ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी लोकमत कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.  या  विशेष समारंभात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे चेअरमन स्वामी बाबा रामदेव आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. 
देवांचे विधान आणि देशाचे संविधान तोडले नाही तर तुम्हाला कुणीही काही, करू शकत नाही, असे वक्तव्य योगगुरू  बाबा रामदेव यांनी  गुरुवारी केले. लोकमत आयकॉन्स ऑफ विदर्भ कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी विकास करत असलेल्यावर टीका होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत यामुळे तरुण पिढी व्यथित होत असल्याचे सांगितले. तसेच 2025 पर्यंत पतंजली एक लाख कोटी रुपयांचे टर्नओव्हर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. 
त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना  लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा  यांनी आजचे आयकॉन्स हे विदर्भाची शान, विदर्भासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच लोकमतने  केवळ बातम्या  देणे हेच काम केले नसून समाजातील प्रतिभावंतांना शोधण्याचेही काम केल्याचे ते म्हणाले. 
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात सेल्फी काढता काढता समाज सेल्फीश होत चालला असल्याची खंत व्यक्त केली. चांगले काम करणाऱ्यांचा आपल्या देशात सन्मान होतो.  पुरस्कार मिळल्यानंतर चांगले काम करण्याची अपेक्षा वाढले, असेही त्यांनी सांगितले. तर केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी  देशाबाहेर जाणारा पैसा देशात थांबवून बाबा रामदेव यांनीं मोठे काम केले, असे सांगत रामदेब यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. 
विदर्भातील ५० यशस्वी प्रोफेशनल्सनी कथन केलेला जीवनातील सुख-दु:खाचा प्रवास कॉफी टेबल बुकमध्ये मांडला आहे. त्यांच्यापासून कुणीही प्रेरणा घ्यावी, असे त्यांचे अनुभव आहेत. त्यांच्या जीवनातील यशस्वीतेच्या नोंदी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा लोकमतचा प्रयत्न आहे. सर्व मान्यवरांची निवड ज्युरींनी केली आहे. यशस्वी प्रोफेशनल्समध्ये पुरुष आणि महिला डॉक्टर, वकील, शैक्षणिक तज्ज्ञ, उद्योजक, शेफ, हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे.

बाबा रामदेव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- लोकमतने 100 वर्षातही विश्वसनीयता कायम राखली
- विकास करत असलेल्यांवर टीका होते . पण यामुळे तरुण पिढी व्यथित होते
- देवांचे विधान आणि देशाचे संविधान तोडले नाही तर तुम्हाला कुणी काही करू शकत नाही 
-  2025 पर्यंत पतंजली एक लाख कोटी रुपयांचे टर्नओव्हर करणार
-  800 टन प्रति दिवस संत्र ज्यूस काढण्याची व्यवस्था ऑक्टोबरपर्यंत विदर्भात करणार
-  कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी आधारित प्रक्रिया, प्रकल्प वाढविणार
- 99 टक्के सिने अभिनेत्री, अभिनेते योग करतात
- सकाळी जो योग करणार त्याचा दिवस चांगला जाणार

Web Title: If you do not break the laws of God and the country's constitution, then nobody can do anything - Baba Ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.