जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन - खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 10:32 PM2018-09-02T22:32:38+5:302018-09-02T22:33:12+5:30

If the people are said to be guilty, will leave politics - Khadse | जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन - खडसे

जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन - खडसे

Next

मुक्ताईनगर : महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्याचे संपूर्ण श्रेय एकनाथ खडसेंना जात असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. तर यावर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन, असा इशारा खडसे यांनी दिला.


जळगावमध्ये खडसेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी खस्ता खाल्ल्या. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आला. त्याचे पूर्ण श्रेय नाथाभाऊंनाच जाते. हा अन्याय दूर करण्यासाठी आपण पक्ष श्रेष्ठींशी बोलणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. 

यावर खडसे यांनी आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नसल्याचे सांगितले. तसेच दीवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवादाचा आधार घेत आपल्या मागे जनता असल्याचे सुचित केले. याचवेळी खडसे यांनी एक संकल्प सोडला. आपण क्लीन चीट आहोत, हे मान्य करायला सरकार तयार नाही. यामुळे आपण दोषी नसल्याचे पटवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


तसेच जर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास आपण राजकारण सोडणार असल्याचा इशारा खडसे यांनी दिला. 

Web Title: If the people are said to be guilty, will leave politics - Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.