येत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 03:21 PM2018-10-22T15:21:53+5:302018-10-22T15:29:55+5:30

गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात, अशी धक्कादायक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

If the minister comes, the road is ready; There will not be a single pit in the next ten years - Chandrakant Patil | येत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही - चंद्रकांत पाटील

येत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही - चंद्रकांत पाटील

Next

कल्याण :  गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात, अशी धक्कादायक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.  कल्याण-पडघा रोडवरील बापसई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना चाव्या वाटप मंत्री पाटील यांच्या हस्ते काल (दि.21) करण्यात आले आहे.

राज्यभरातील रस्त्यावरील खड्ड्यावरुन पाटील यांना लक्ष्य केले जात असताना त्यांनी पुन्हा एकदा येत्या दहा वर्षात राज्यातील एकाही रस्त्याला खड्डा नसेल, असे रस्ते तयार केले जातील असे वक्तव्य केले. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गाची विकास कामे केली जात आहे.  2022 पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रस्ते तयार करणाऱ्यांना कंत्राटदार कंपनीकडे त्याच्या दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे. तीन ते पाच वर्षाचे दायित्व दिले जाईल. रस्ता विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्त्यावर खड्डा पडला. रस्ता खराब झाला तर संबंधित कंपनीकडून त्यांची दुरुस्ती देखभाल करणे व बुजविण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
मंत्री येणार असेल तर सरकारी यंत्रणा कामाला लागते. रस्ते तयार केले जातात. रस्ता तयार करण्याची सूचना नसेल तरी रस्ता तयार केला जातो. हावरे यांनी सांगितल्याप्रमाणे कल्याण पडघा रोडपासून हावरे यांच्या गृह प्रकल्पात सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा अरुंद रस्ता तयार केला. हा रस्ता हावरे प्रकल्पासाठी केला गेला असला तरी त्याच रस्त्यावरुन पाटील प्रकल्पाच्या ठिकाणी येणार असल्याने त्यांच्यासाठीच हा रस्ता तयार केला. मंत्री असण्याचे फायदे असतात. रस्ता तयार होतो असेही वक्तव्य पाटील यांनी येथे केले.

Web Title: If the minister comes, the road is ready; There will not be a single pit in the next ten years - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.