उस्मानाबादमध्ये चीन, पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

By Admin | Published: July 11, 2017 10:34 PM2017-07-11T22:34:36+5:302017-07-11T22:34:36+5:30

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ढोकी येथे युवा सेना व ग्रामस्थांच्या वतीने चीन, पाकिस्तानचे ध्वज, वस्तू फलकांची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली़

Holi of China, Pakistan flag in Usmanabad, Pakistan | उस्मानाबादमध्ये चीन, पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

उस्मानाबादमध्ये चीन, पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
ढोकी(उस्मानाबाद), दि. 11 - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ढोकी येथे युवा सेना व ग्रामस्थांच्या वतीने चीन, पाकिस्तानचे ध्वज, वस्तू फलकांची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली़
भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी सरकारने अधिकृतपणे चिनी वस्तूंचा वापर न करण्याविषयी जाहीर भूमिका घ्यावी, भारत देशातील सर्व व्यापाऱ्यांनी ‘मेड इन चायना’च्या वस्तू खरेदी आणि विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले़ यावेळी चीन, पाकिस्तान ध्वज आणि चिनी ड्रॅगन व इतर वस्तूंच्या फलकाला चपलाचे फटके मारून त्याची होळी करण्यात आली़ यावेळी अमरनाथ दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते़

Web Title: Holi of China, Pakistan flag in Usmanabad, Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.