Hiralal Jadhav's suspension, the high court's maternal uncle | हिरालाल जाधव यांचे निलंबन योग्य, उच्च न्यायालयाचा मॅटला दणका

मुंबई : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील जेल अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्याचा निर्णय योग्य ठरवत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मॅटला चांगलाच दणका बसला आहे.
वादग्रस्त जेल अधीक्षक जाधव यांच्याविरुद्ध आॅगस्ट २०१६ मध्ये महिला अधिकाºयाने तक्रार दाखल केली होती. यात जाधव यांच्यावर लैंगिक शोषण, भ्रष्टाचार आणि खंडणी यांसारखे गंभीर आरोप केले होते. आरोपासंबंधी महिला अधिकाºयाने व्हॉट्स अ‍ॅप संदेश, कॉल रेकॉर्ड सादर केले होते. याबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
परिणामी, जाधव यांच्यावर सप्टेंबर २०१७ मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाईच्या विरोधात जाधव यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने जाधव यांच्या बाजूने कौल देत, ‘तत्काळ निलंबन रद्द करून सेवेत समाविष्ट करून घ्या,’ असे आदेश राज्य सरकारला दिले. राज्य सरकारने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाच्या न्या़ विजया कापसे-तहिलरमानी आणि न्या़ एम.एस.कर्णिक या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.