कोरेगाव-भीमा प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर करण्यास हायकोर्टाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:14 AM2018-05-11T05:14:13+5:302018-05-11T05:14:13+5:30

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत एकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तिघांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.

High Court's denial for granting interim bail in the case of Koregaon-Bhima case | कोरेगाव-भीमा प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर करण्यास हायकोर्टाचा नकार

कोरेगाव-भीमा प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर करण्यास हायकोर्टाचा नकार

googlenewsNext

मुंबई : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत एकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तिघांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
१ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीत राहुल फटांगडे याला जमावाने मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी चेतन अल्हट (१९), अक्षय अल्हट (२०) आणि तुषार जुंजाळ (१९) यांना अटक केली. त्यांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असलेले टी शर्ट घातल्याने पोलिसांनी अटक केली. फटांगडेला मारहाण केली, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे पुरावे नाहीत किंवा या तिघांकडून कोणतेही शस्त्र जप्त केलेले नाही. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. भारती डांग्रे यांनी या जामीन अर्जांवर तत्काळ सुनावणी घेणे गरजेचे नाही, असे सांगत सुनावणी पुढील महिन्यात ठेवली. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांनाही अटक केली होती. गेल्या महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

Web Title: High Court's denial for granting interim bail in the case of Koregaon-Bhima case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.