आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प ''सार्थक''...कोल्हापूरच्या युवकाची प्रेरणादायी यशोगाथा..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:41 PM2019-05-29T16:41:25+5:302019-05-29T16:54:15+5:30

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी करत असताना आईचे अपघाती निधन झाले. मात्र, तो खचला नाही...

he succeful in completed Mother's Dream ... inspirational achievement story of Kolhapur youth | आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प ''सार्थक''...कोल्हापूरच्या युवकाची प्रेरणादायी यशोगाथा..

आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प ''सार्थक''...कोल्हापूरच्या युवकाची प्रेरणादायी यशोगाथा..

Next
ठळक मुद्देरिक्षा चालकाचा मुलगा झाला लष्करी अधिकारीकोल्हापुरच्या सार्थक धवनची यशोगाथा एनडीए महाराष्ट्रात पण एनडीएत महाराष्ट्र नाही

पुणे : घरची परिस्थिती बेताची...मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी रोज रिक्षा चालवून वडिलांनी शिकविले. ज्या कष्टाने त्यांनी शिकवले त्यांचे ऋण फेडण्यासाठी तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी लष्करात जाण्याचा मार्ग निवडला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी करत असताना आईचे अपघाती निधन झाले. मात्र, तो खचला नाही. मोठ्या धैर्याने घरी कुठलेही लष्करी पाठबळ  नसताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा पास झाला. सुरवातीचे दोन वर्ष कठीण गेले. मात्र, मित्रांचा आणि प्रशिक्षकांच्या मदतीने प्रबोधिनीत पहिल्या चार विद्यार्थ्यांमध्ये त्याने स्थान मिळवले. सार्थक धवन असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. सामान्य घरातील मुलगा ते लष्करी अधिकारी होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी देशातील लष्करी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था आहे. लहानपणापासून लष्करात दाखल होण्याचे स्वप्न धवन  याने पाहिले. घरची परिस्थिती बेताची होती. वडील दिवसभर रिक्षा चालवायचे. आम्हाला शिकवताना त्यांची ओढाताण व्हायची. मात्र ते डगमगले नाहीत. त्यांना मानाने जगता यावे यासाठी लष्कराचा मार्ग निवडला असे धवन म्हणाला. लष्करात देशसेवा करतांना मिळणारा मान मोठा असतो. इतर कुठल्याही सेवेत या प्रकारचा सन्मान मिळत नाही. १० पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले. ओंरगाबाद येथील एका विद्यालयातून १२ वीचे शिक्षण घेतले आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी केली. वडिलांचे अनेक मित्र लष्करात होते. यामुळे त्यांच्यापासून लष्करात दाखल होण्याची दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. जिद्दीने अभ्यास केला. मात्र, दरम्यानच्या काळात आईचे अपघाती निधन झाले. आईच्या आकस्मिक निधनामुळे मोठा धक्का बसला. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जिद्दीने अभ्यास केला. आज माझे यश पाहायला ती नाही. ती आज असती तर माझ्या यशाने तिचे उर भरून आले असते, असे धवन म्हणाला. त्याच्या या प्रवासात माझ्या भावाने मला मोठा पाठिंबा दिला. एनडीएत आल्यानंतर सुरूवातीचे दोन वर्ष खूप त्रासदायक गेले. मात्र, मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करू शकलो. आर्मी कॅडेट असल्यामुळे राष्ट्रीय रक्षा अकादमीत पुढील प्रशिक्षणासाठी जाणार असून भविष्यात देशाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्य आत्मसात करणार असल्याचे धवन म्हणाला. 
............
एनडीए महाराष्ट्रात पण एनडीएत महाराष्ट्र नाही
देशासाठी लष्करी अधिकारी तयार करणारी मानाची असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी महाराष्ट्रात आहे. संपूर्ण देशभरातून येथे विद्यार्थी  येतात. मात्र, राज्यातील विद्यार्थ्यांचे निवड होण्याचे प्रमाणात खूप कमी आहे. मराठी मुलांनी  महाराष्ट्रातील या महत्वाच्या आणि मानाच्या संस्थेत मोठ्या प्रमाणावर भरती व्हावे. यासाठी त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था व्हावी असे धवन म्हणाला. 
--------------------------

Web Title: he succeful in completed Mother's Dream ... inspirational achievement story of Kolhapur youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.