‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:43 AM2017-08-22T00:43:33+5:302017-08-22T00:43:39+5:30

Happy anniversary of 'Lokmat' | ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रिमझिम बरसणाºया श्रावणधारा आणि अलोट लोकधारेच्या शुभेच्छांच्या वर्षावात ‘लोकमत’चा तेरावा वर्धापनदिन सोमवारी उत्साही वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रांत कर्तबगारी गाजविणाºया व्यक्तिमत्त्वांबरोबरच सर्वसामान्य वाचक, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाºयांबरोबरच सर्व स्तरांतील नागरिकांनी आस्थेने उपस्थित राहत ‘लोकमत’वरील स्नेह आणखी दृढ केला.
‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेल्या ‘लोकमत’च्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेला हा स्नेहमेळावा विविध क्षेत्रांतील सुहृदांसाठी गाठीभेटीचा हृद्य सोहळाच ठरला. कसबा बावडा परिसरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याच मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’च्या ‘डिजिटल लाईफ’ या विशेषांकाचे प्रकाशन झाले.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्णातील विविध प्रश्नांची समर्थपणे मांडणी करणाºया, प्रसंगी ते धसास लावण्यासाठी वाईटपणाही स्वीकारणाºया, विधायक उपक्रमांना मजबूत पाठबळ देणाºया आणि विघातकतेच्या विरोधात पाय रोवून उभारणाºया ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून हितचिंतकांनी महासैनिक दरबार हॉलमध्ये उपस्थित राहायला सुरुवात केली.
भव्य अशा व्यासपीठावर शाहू छत्रपती, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खास उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. तसेच महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, दिनकरराव जाधव, संजय घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिलेल्या शुभेच्छा ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांनी स्वीकारल्या.
येणाºया सर्वांचे महासैनिक दरबार हॉलच्या प्रवेशद्वारावर तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले. शुभेच्छा देण्यासाठी डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, उद्योजक दिलीप मोहिते, प्रा. डॉ. जे. एफ .पाटील, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, राजीव परीख, मोहन मुल्हेरकर, चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे उपस्थित होते.
‘डिजिटल लाईफ’बद्दल उत्स्फूर्त प्रतिक्रिया
यंदा वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’ने ‘डिजिटल लाईफ’ विषयाला वाहिलेला विशेषांक प्रकाशित केला. सर्व क्षेत्रांमध्ये ‘डिजिटल’ तंत्रज्ञानामुळे झालेल्या आमूलाग्र बदलांचा आढावा या विशेषांकामध्ये घेण्यात आला आहे. याची दखल घेत अनेक वाचकांनी कार्यक्रमस्थळी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांची उत्तम माहिती या विशेषांकामधून मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यात वेगळ्या धाटणीचा विषय हाताळल्याच्याही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

Web Title: Happy anniversary of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.