जीएसटीतील जाचकपणा काँग्रेसमुळेच: पियूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 08:44 PM2019-04-18T20:44:39+5:302019-04-18T20:49:53+5:30

बैठकीत एक व बाहेर दुसरी अशा काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच लहान व्यापाऱ्यांना आम्हाला द्यायचा असलेला लाभ मिळू शकला नाही..

GST problems due to Congress's : Piyush Goyal | जीएसटीतील जाचकपणा काँग्रेसमुळेच: पियूष गोयल

जीएसटीतील जाचकपणा काँग्रेसमुळेच: पियूष गोयल

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा कर व्यवस्थेत असणारा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी म्हणून जीएसटी, ऑनलाईन कर

पुणे: लहान व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्याची मर्यादा भाजपाने ७५ लाखांची केली होती, मात्र सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने त्याला विरोध केला व ती मर्यादा ४० लाख झाली. बैठकीत एक व बाहेर दुसरी अशा काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच लहान व्यापाऱ्यांना आम्हाला द्यायचा असलेला लाभ मिळू शकला नाही असा थेट आरोप केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी काँग्रेसवर गुरूवारी (दि. १८) पुण्यात बोलताना केला.  
भाजपा शिवसेना महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्यासाठी आयोजित शहरातील व्यापाºयांच्या मेळाव्यात गोयल यांनी भाजपाची भूमिका मांडली. उमेदवार बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधूरी मिसाळ, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच स्थानिक नगरसेवक प्रविण चोरबेले, बाळा ओसवाल, कविता वैरागे व दीपक मिसाळ, अजय भोसले, शर्मिला ओसवाल आदी यावेळी उपस्थित होते. 
गोयल म्हणाले आम्ही व्यापाऱ्यांकडे चोर म्हणून पहात नाही. व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या या ५ वर्षातील नाहीत, तर त्यापुर्वीच्या आहेत. कर व्यवस्थेत असणारा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी म्हणून जीएसटी, ऑनलाईन कर अशा नव्या गोष्टी भाजपा करत आहे व त्याचा चांगला फायदा होत आहे. याआधी काहीही केले तरी चालेल अशी वृत्ती होती, ती नियमात राहूनच सगळे केले पाहिजे अशी आम्ही बदलत आहोत. मुक्त व पारदर्शक धोरण अंमलात आणले जात आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीला फक्त घोषणा करायच्या आहेत, गेली अनेक वर्षे काँग्रेस गरीबी हटाव च्या घोषणा करत आहेत, त्यांची गरीबी हटली व गरीबांची मात्र वाढली असे गोयल म्हणाले. बापट व अन्य वक्त्यांचीही यावेळी भाषणे झाली. बहुसंख्य व्यापाऱ्यांनी जीएसटी ची पद्धत जाचक असल्याच्या तक्रारी केल्या. यात गरज व आवश्यकता लक्षात घेऊन हळूहळू बदल होत जातील असे गोयल यांनी त्यांना सांगितले. 

Web Title: GST problems due to Congress's : Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.