शेतकरी कर्जमाफीच्या व्याप्तीत वाढ, थकीत पीक कर्जासह जुलैअखेरच्या व्याजाचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:54 AM2017-08-24T00:54:04+5:302017-08-24T00:54:17+5:30

शेतकरी कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविताना या योजनेचा लाभ थकीत रकमेची काही प्रमाणात परतफेड केलेले शेतकरी तसेच पुनर्गठित शेतक-यांच्या थकीत हप्त्यांसह भविष्यात भरावयाच्या उर्वरित हप्त्यांचाही या योजनेत समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.

Growth in farmer debt waiver, including late interest along with crop loans | शेतकरी कर्जमाफीच्या व्याप्तीत वाढ, थकीत पीक कर्जासह जुलैअखेरच्या व्याजाचाही समावेश

शेतकरी कर्जमाफीच्या व्याप्तीत वाढ, थकीत पीक कर्जासह जुलैअखेरच्या व्याजाचाही समावेश

Next

- विशेष प्रतिनिधी ।

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविताना या योजनेचा लाभ थकीत रकमेची काही प्रमाणात परतफेड केलेले शेतकरी तसेच पुनर्गठित शेतक-यांच्या थकीत हप्त्यांसह भविष्यात भरावयाच्या उर्वरित हप्त्यांचाही या योजनेत समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.
आजच्या निर्णयानुसार १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६च्या कालावधीत घेतलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६पर्यंत थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची दीड लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीस पात्र करण्यात आली आहे. अशी रक्कम दीड लाखाच्या वर असल्यास एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६पर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जापैकी ३० जून २०१६ पूर्वी किंवा नंतर झालेल्या झालेल्या पुनर्गठित-फेरपुनर्गठित कर्जाचे ३१ जुलै २०१७पर्यंत व्याजासह थकीत व उर्वरित हप्ते दीड लाखाच्या आत असल्यास त्याचा योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, अशी रक्कम दीड लाखाच्या वर असल्यास एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी दीड लाखावरील थकीत पीक कर्ज, पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जाची थकीत उर्वरित रक्कम ३१ डिसेंबर २०१७पर्यंत भरणे आवश्यक आहे. २०१५-१६मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड ३१ जुलै २०१७पर्यंत केली असल्यास तसेच २०१६-१७ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३१ जुलै २०१७पर्यंत संपूर्ण परतफेड केलेल्या शेतकºयांना २०१५-१६मधील पीक कर्जाच्या व्याजासह होणाºया रकमेच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपैकी कमी असलेली रक्कम शेतकºयांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून देण्यात येणार आहे. मात्र, ही रक्कम १५ हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही. तसेच शेतकºयांनी परतफेड केलेली रक्कम १५ हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशी संपूर्ण रक्कम शेतकºयांना प्रोत्साहनपर देण्यास मान्यता देण्यात आली.
आपले सरकार सेवा केंद्रामध्ये शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी भरण्यात येणाºया अर्जासाठी केंद्रांना प्रति अर्ज १० रुपयांप्रमाणे शुल्क शासनामार्फत देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

एकरकमी परतफेडनुसार लाभ
१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६च्या कालावधीत घेतलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६पर्यंत थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची दीड लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीस पात्र करण्यात आली आहे. अशी रक्कम दीड लाखाच्या वर असल्यास एकरकमी परतफेड योजनेनुसार लाभ मिळणार आहे़

Web Title: Growth in farmer debt waiver, including late interest along with crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी