‘गोकुळ’ दूध दरवाढीचा संघर्ष पेटला, गायीच्या दुधास अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 4:16am

जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. गायीच्या दुधास दोन रुपये दरवाढ देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे आर्थिक केंद्र असलेल्या ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. गायीच्या दुधास दोन रुपये दरवाढ देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चास आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील सत्तारूढ गटाने विराट प्रतिमोर्चा काढून जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘गोकुळ’ हा देशात नावाजलेला दूध संघ आहे़ अशा संस्थेची बदनामी यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला. राज्य शासनाने गायीच्या दुधास लीटरमागे प्रत्येकी पाच रुपयांचे अनुदान थेट उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली व तसे लेखी निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. गेल्या आठवड्यात आमदार पाटील यांनी मोर्चा काढून ‘गोकुळ’च्या कारभारावर व संचालकांच्या उधळपट्टीवर टीकेची झोड उठविली होती. या संस्थेचा वापर महाडिक यांच्या खासगी मालमत्तेसारखा होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तो जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेऊन हा निषेध मोर्चा व जागृती मेळावा काढला. त्यामध्ये महिलांसह गावोगावचे उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले. माजी आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘महाडिक व पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या राजकारणात ‘गोकुळ’चे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. चांगली संस्था राजकीय आरोप-प्रत्यारोप करून बदनाम होणार नाही याची दक्षता घ्या.’ हा मोर्चा संपल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाडिक यांच्या २३ टँकरची यादीच जाहीर केली. हे आमच्या गोरगरीब कार्यकर्त्यांचे टँकर आहेत, असे खासदार महाडिक सांगत असतील तर मग ४५ लाखांचा टँकर घेणारे हे कोण गरीब कार्यकर्ते आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हानही पाटील यांनी दिले.महादेवराव महाडिक म्हणाले, गोकुळ हे महाडिक कुटुंबांचे शक्तिस्थान आहे़ त्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहू लागले तर उत्पादकच त्यांना पुरून उरतीलक़ोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील सत्तारूढ गटातर्फे गुरुवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यात उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

संबंधित

सोनई हत्याकांडातील सहा खुन्यांना फाशी; आरोपी तर सैतानच आहेत, न्यायालयाची टिप्पणी
मंत्र्यांच्या हट्टापायी २ कोटी जनावरांना धोका; राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा चुकली लस
63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी
हुंड्यासाठी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; लग्नानंतरही पैशाची मागणी, उच्चभ्रू वसाहतीतील वास्तव उघड
डोंबिवलीत बँक ग्राहकांना गंडा! कॅनेरा, युनियन बँकेचे आठ खातेदार अडचणीत

महाराष्ट्र कडून आणखी

कोकण रेल्वे हाउसफुल्लच्या मार्गावर, मे महिन्यासाठी प्रतीक्षा यादी, ‘तेजस’लाही चांगला प्रतिसाद
उजळून देण्याच्या बहाण्याने सहा तोळे सोने पळविले
पाण्याची गरज लक्षात घेत उल्हासच्या उपखो-यातील पाण्याचा एकात्मिक जल आराखडा
खोटे बोललेलं गळून पडू नये म्हणून लाखोंचा मेकअप केला जात असावा - धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला 
उल्हासनगरात रिक्षा चालकाने जॅमर पळविले, गुन्हा दाखल

आणखी वाचा