‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करा, विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 5:48am

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असून या ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करावा, असा सणसणीत टोला विरोधकांनी लगावला आहे.

मुंबई : राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना मॅनेज करा, हे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असून या ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करावा, असा सणसणीत टोला विरोधकांनी लगावला आहे. ‘डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, बांधकाममंत्र्यांचा अजब सल्ला’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकांम मंत्र्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. चंद्रकांतदादा म्हणतात तसे सार्वजनिक बांधकाम खाते वर्र्षाला ४ हजार कोटी रुपये खर्च करीत असेल तर मागील तीन वर्षात खर्च झालेले १२ हजार कोटी रुपये कुठे गेले? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, राज्यात पारदर्शक भ्रष्टाचार सुरु आहे. अधिकाºयांना भ्रष्टाचार कसा करायचा याचे सल्ले महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या मंत्र्याने दिले नव्हते. पाटील यांनी ती कमतरता भरून काढली आहे. त्यामुळे त्यांचा शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार केला पाहिजे. राज्याचा कॅबिनेट मंत्री अशा प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. यासोबतच पत्रकारांना मॅनेज करून चांगल्या बातम्या छापून आणा असे सांगण्याने माध्यमांच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभे होते, असेही सावंत म्हणाले.

संबंधित

 उस्मानाबादेत महसूलमंत्र्यांना राष्ट्रवादीने दाखवले काळे झेंडे; गाडी अडवण्याचा केला प्रयत्न 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी आला तरी तो माणूस होतो - एकनाथ खडसे
हार्दिक पटेल काँग्रेसच्या बाजूने, भाजपाला विरोध कायम
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व भाजपा नेते ‘जैश-ए-मोहम्मद’च्या रडारवर, गुप्तचर यंत्रणांना माहिती
काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त ट्विट, सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

महाराष्ट्र कडून आणखी

लोकशाहीसाठी संहितांची निर्मिती करण्याची मागणी
गोष्ट शिक्षिका घडण्याची
‘लठ्ठ महिलांना जगण्याचा हक्क नाही', ट्विटने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
मालमत्तेच्या वादातून जन्मदात्रीविरोधात मुलीने केला पोलिसांत गुन्हा दाखल
मराठमोळ्या डॉक्टर रखमाबाई राऊत यांना गूगलची डूडलमधून मानवंदना

आणखी वाचा