मालमत्तेच्या वादातून जन्मदात्रीविरोधात मुलीने केला पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:10 PM2017-11-22T17:10:17+5:302017-11-22T17:35:19+5:30

The girl filed a complaint against the child in connection with the property dispute | मालमत्तेच्या वादातून जन्मदात्रीविरोधात मुलीने केला पोलिसांत गुन्हा दाखल

मालमत्तेच्या वादातून जन्मदात्रीविरोधात मुलीने केला पोलिसांत गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमालमत्तेच्या कागदपत्रावर सह्या करण्यास नकारसरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : मालमत्तेच्या कारणावरून जन्मदात्या आईने मुलीसोबत वाद घालून घराच्या मुख्य दरवाजाची कडी लावून घेत मालमत्तेच्या कागदपत्रावर सह्या न केल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याची फिर्याद मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात अंधेरी येथील डॉ़तरणजीत कौर चढ्ढा (३१, राफ़्लॅट नंबर ३, सुखसागर सोसायटी, अंधेरी ईस्ट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ९ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी सव्वातीन वाजता आपली मुलगी विवियाना व सासू हरविंदर कौर चढ्ढा यांच्यासह शहरातील टिळकवाडीतील आई-वडीलांच्या घरी आल्या होत्या़ यावेळी घरी असलेली आई मनजित कौर मैनी यांनी दरवाजा उघडला व मुलगी डॉ़तरणजित कौर यांच्यासोबत मालमत्तेच्या कारणावरून वाद घालण्यास सुरूवात केली़ घराच्या मुख्य दरवाजाची कडी लावून घेत डॉ़ कौर यांना घरातून बाहेर जाण्यास रोखले तर मनजीत कौर मैनीयांनी घरातील रुममध्ये जाऊन मालमत्तेची कागदपत्रे आणून मुलीला सह्या करण्यास सांगितले़ मुलीने यास नकार देताच राग आलेल्या मनजीत कौर यांनी मुलीला बघून घेण्याची धमकी दिली़
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित मनजीत कौर मैनी (रा़प्लॉट नंबर २४१, सरदार बंगला, टिळकवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़


मिळकतीचा वाद
डॉ़तरणजित कौर यांचे आजोबा इंदरजित सिबल यांनी नाशिकमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेवर त्यांच्या मृत्यूनंतर मनजित कौर (आई), जितेंदरसिंग सिबल (मामा) व आजी अमजित कौर सिबल यांची नावे लागली़ २००८ मध्ये डॉ़तरणजित कौर यांनी आईला आपल्या मालमत्तेच्या हिश्श्याबाबत विचारले असता तो ठेवला असल्याचे सांगितले़ मात्र विश्वास न पटल्याने त्यांनी माहिती अधिकारात कागदपत्रे मिळविली त्यावर आपले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसिलदारांकडे मालमत्तेवर नाव लावण्यासाठी अर्ज केला़ १० जानेवारीला शहरातील १२ मालमत्तांवर त्याचे नाव लावण्यात आले होते़ यानंतर आई-वडील राहत असलेल्या घराच्या सातबाºयावर नाव लावण्यासाठी अर्ज केला असून त्यावर तहसिलदारांनी आदेशही दिला आहे़

Web Title: The girl filed a complaint against the child in connection with the property dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.