Video - कागलला धनंजय महाडिक यांच्या भाषणावेळी गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:11 PM2019-01-28T12:11:45+5:302019-01-28T14:05:07+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालत आक्षेप घेतला, त्यामुळे खासदार महाडिक यांना भाषण थांबवणे भाग पडले. हा सगळा प्रकार पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीतच घडला. यावरुन पक्षातील दुफळी उघड झाली आहे.

Ghaghal during the speech of Dhananjay Mahadik of Kagla | Video - कागलला धनंजय महाडिक यांच्या भाषणावेळी गोंधळ

Video - कागलला धनंजय महाडिक यांच्या भाषणावेळी गोंधळ

ठळक मुद्देकागलला धनंजय महाडिक यांच्या भाषणावेळी गोंधळराष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला गटबाजीचे गालबोट, महाडिक विसरले मुश्रीफ यांचे नाव

कागल/कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालत आक्षेप घेतला, त्यामुळे खासदार महाडिक यांना भाषण थांबवणे भाग पडले. हा सगळा प्रकार पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीतच घडला. यावरुन पक्षातील दुफळी उघड झाली आहे.

महाडिक यांनी भाषणात मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने या सभेत सुरुवातीला चुळबूळ सुरु झाली. नंतर त्याचे रुपांतर घोषणाबाजीत झाले. मुश्रीफ यांनी व्यासपीठावरुन कार्यकर्त्यांना दम दिला, तरीही कार्यकर्ते आक्रमकपणे घोषणा देतच होते. त्यामुळे महाडिक भाषण थांबवून खाली बसले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवारही उठून उभे राहिले. आमदार मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांना पुन्हा माईकजवळ आणले, आणि त्यांना भाषण पुन्हा सुरु करण्यास सांगितले. महाडिक यांनी यावेळी जाहीर दिलगिरी व्यक्त केली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरुन मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. महाडिक यांच्या उमेदवारीला मुश्रीफ यांनी थेट शरद पवार यांच्या उपस्थितीतच विरोध केला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीतील हा वाद नव्याने पेटण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Ghaghal during the speech of Dhananjay Mahadik of Kagla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.