तेजस एक्स्प्रेसच्या २४ प्रवाशांना आॅम्लेटमधून झाली विषबाधा, चिपळूणमध्ये रेल्वे थांबविली : चौघांची प्रकृती गंभीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:31 AM2017-10-16T05:31:19+5:302017-10-16T05:32:56+5:30

कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

 Four passengers of Tejas Express stopped returning to the airport in Chiplun; | तेजस एक्स्प्रेसच्या २४ प्रवाशांना आॅम्लेटमधून झाली विषबाधा, चिपळूणमध्ये रेल्वे थांबविली : चौघांची प्रकृती गंभीर  

तेजस एक्स्प्रेसच्या २४ प्रवाशांना आॅम्लेटमधून झाली विषबाधा, चिपळूणमध्ये रेल्वे थांबविली : चौघांची प्रकृती गंभीर  

चिपळूण (जि. रत्नागिरी) : कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या खानपान सेवेचे कॅगने वाभाडे काढले होते.
रत्नागिरी स्टेशन सोडल्यानंतर प्रवाशांना उलटी होत असल्याचे तिकीट तपासनीसाच्या लक्षात आले. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता चिपळूण स्टेशनवर गाडी थांबविण्यात आली. रेल्वेच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर विषबाधित २४ प्रवाशांना लाइफकेअर इस्पितळात दाखल करण्यात आले.
शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर चिपळूणचे शिवसेना आ. सदानंद चव्हाण यांच्यासह नागरिकांनी विषबाधा झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार या रेल्वेतील खानपान सेवेचे कंत्राट जे. के. घोष कंपनीस दिलेले आहे. रविवारी एकूण २२० प्रवाशांना नाश्ता पुरविण्यात आला. त्यापैकी १३० प्रवाशांनी शाकाहारी तर इतरांनी मांसाहारी नाश्ता घेतला होता. विषबाधा झालेल्यांपैकी बहुतेकांनी आॅम्लेट खाल्ले होते. पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

...म्हणे आधुनिक सुखसोयींची गाडी!
गोव्यातील करमाळी आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाºया तेजस एक्स्प्रेसचे, आधुनिक सुखसोयी असलेली सेमी हाय स्पीड गाडी म्हणून गाजावाजा करून जूनमध्ये उद््घाटन केले होते. स्वयंचलित दरवाजे, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग पॉइंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती व्यवस्था, सेलीब्रिटी शेफ मेन्यू आणि कॉफी व्हेंडिंग मशीन या सोयींची मोठी प्रसिद्धी केली गेली होती.

‘कॅग’ने काढले होते वाभाडे

भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) त्यांच्या अहवालात रेल्वेच्या निकृष्ट अन्नपदार्थांवर ताशेरे ओढल्यानंतर तीन महिन्यांनी रविवारची दुर्घटना घडली. ‘कॅग’ने ७४ निवडक रेल्वे स्टेशन आणि ८० गाड्यांमध्ये विकल्या जाणाºया खाद्यपेयांची तपासणी करून अहवाल दिला होता.
अन्नपदार्थ माशा व धूळ बसू नये म्हणून झाकूनही ठेवले जात नाहीत व जेथे पदार्थ तयार करतात त्या पॅन्ट्रीमध्ये झुरळे व उंदीर फिरत असतात, असे तपासणीत आढळून आले होते.
रेल्वे स्टेशनवर मानवी सेवनास अयोग्य, दूषित व पुन्हा गरम केलेले शिळे अन्नपदार्थ विकले जातात. अनेक वेळा विक्रीसाठी ठेवलेले पाकीटबंद व बाटलीबंद पदार्थ हे सेवनासाठीची मुदत संपून गेलेले असतात, असेही अहवालात नमूद केले गेले होते.

पनवेल स्टेशनवर तयारी

पनवेल : तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी पनवेल स्टेशनवर तयारी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात एकच बाधित प्रवासी या गाडीने आला. विषबाधेची माहिती मिळाल्यानंतर, पनवेल स्टेशनवर १२ रुग्णवाहिका, ३ डॉक्टर, स्ट्रेचर, व्हीलचेअर तयार ठेवण्यात आले होते. लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये १५ बेड राखीव ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात सी-२ डब्यातून प्रवास करणा-या डोंबिवलीच्या तृप्ती देसाई याच पनवेल स्टेशनवर उतरल्या. तृप्ती देसाई या आपले पती, सासूबाई व एक वर्षाच्या मुलाबरोबर कुडाळ ते ठाणे प्रवास करीत होत्या. त्यांचे पती व सासूबाईने शाकाहारी नाश्ता केला. मात्र, तृप्ती देसाई यांनी आॅम्लेट घेतले होते, त्याचा त्यांना त्रास झाला. मात्र, पनवेल येथे आल्या, त्या वेळी त्यांची प्रकृती ठीक होती.

Web Title:  Four passengers of Tejas Express stopped returning to the airport in Chiplun;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.