ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 23 -  वसमत येथील पूर्णा कारखाना भागात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मोकळ्या प्लॉटमध्ये विटा ठेवल्याच्या कारणातून झालेल्या वादात जागामालक व शेजाºयात झालेल्या वादात भांडण पाहणारे चार जण जखमी झाल्याची घटना घडली होती.
पूर्णा कारखाना परिसरात वसमत येथील संतोष उपरे यांचा प्लाट आहे. या मोकळ्या प्लॉटवर त्याचा शेजारी बाबूराव कोंगे(५१) ने घरबांधकाम करण्यासाठी आणलेल्या विटा व वाळू आदी साहित्य ठेवले होते. संदीप उपरेने बाबूराव कोंगे यास साहित्य का ठेवले, असा जाब विचारत प्लॉटवर कूळ करतो का? असा सवाल विचाराला यातून वाद झाला. वादातून संदीपने पिस्तूल काढले. बाबूराव कोंगे व संदीप यांच्यात झटापट झाली हा आवाज ऐकून परिसरात नागरीक जमले व झटापटीत पिस्तूल लावून उडालेल्या गोळ्या जमावाच्या दिशेने झाडल्या गेल्या. यात ज्ञानेश्वर जाधव, विजय जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले तर गजराबाई जाधव व वर्षा या दोघीही किरकोळ जखमी झाल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीस ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. बाबूराव कोंगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सपोनि गुलाब बाचेवाड यांनी दिली. 
या प्रकरणातील आरोपी तरूण हा वसमत येथील प्रतिष्ठीत व्यापारी कुटूंबातील आहे. त्याच्या हातून हा प्रकार कसा घडला, याचीच चर्चा शहरात होत आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली. (वार्ताहर)