अनिकेत कोथळे हत्याप्रकरण: युवराज कामटेसह पाच पोलिस बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:42 AM2017-11-18T02:42:44+5:302017-11-18T02:48:42+5:30

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ‘थर्ड डिग्री’च्या वापराने संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

 Five policemen including Yuvraj Kamte | अनिकेत कोथळे हत्याप्रकरण: युवराज कामटेसह पाच पोलिस बडतर्फ

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण: युवराज कामटेसह पाच पोलिस बडतर्फ

googlenewsNext

सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ‘थर्ड डिग्री’च्या वापराने संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. या कारवाईचा अहवाल राज्याच्या पोलिस महासंचालकांना सादर करण्यात आला आहे.
लाड, टोणे, शिंगटे व मुल्ला यांना बडतर्फ करण्याचे अधिकार जिल्हा पोलिस प्रमुखांना असल्याने नांगरे-पाटील यांनी पोलिसप्रमुख शिंदे यांना बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
‘थर्ड डिग्री’तील पाईप, तोंड बुडविलेली बादली जप्त-
‘थर्ड डिग्री’वेळी अनिकेत कोथळे यास मारहाण करण्यासाठी वापरलेला लोखंडी पाईप व त्याचे तोंड पाण्यात बुडविण्यासाठी वापरलेली बादली ‘सीआयडी’ने जप्त केली आहे. अनिकेतचा मृतदेह जाळलेल्या आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील घटनास्थळाचीही सीआयडीने पाहणी करून पंचनामा केला.
खून दडपण्याचा सरकारचा डाव : अजित पवार
अनिकेत कोथळे खून प्रकरण दडपण्यात सरकारचा हात आहे की काय, अशी शंका येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार बैठकीत केला.
येत्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात भाजप सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Five policemen including Yuvraj Kamte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.