​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 11:35 AM2019-07-06T11:35:00+5:302019-07-06T11:39:45+5:30

परदेशी पुस्तके वाचणारा भारतीय वाचक वर्ग खूप मोठा आहे.

Five percent customs duty on foreign books | ​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देवाचक ‘ इ बुक’ कडे वळण्याची शक्यतानिर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात परदेशी पुस्तकांवर 5 टक्के सीमाशुल्कपरदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क आकारल्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढणार

पुणे : परदेशी पुस्तके वाचणारा भारतीय वाचक वर्ग खूप मोठा आहे. या पुस्तकांवर 5 टक्के सीमा शुल्क आकारल्यामुळे बाहेरून येणा-या  पुस्तकांच्या किंमती वाढणार आहेत आणि वाचकांना पुस्तके खरेदी करणे न परवडल्यास ते ‘इ बुक’ कडे वळू शकतील, असे प्रकाशकांकडून सांगण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात परदेशी पुस्तकांवर 5 टक्के सीमाशुल्क आकारणीबाबत प्रकाशकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वाचनसंस्कृतीचा एक आढावा घेतल्यास शाळकरी मुले आणि तरूण पिढीमध्ये इंग्रजीसह विविध भाषांमधील पुस्तके वाचण्याचे प्रमाण हे अधिक आहे. या पुस्तकांना चांगली मागणी आहे. मात्र या 5 टक्के सीमाशुल्क आकारणीमुळे पुस्तकाच्या किंमती वाढणार आहेत. याचा  पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 
---------------------------------------------------------------------------------------------------
परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क आकारल्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढतीलच. ही पुस्तके वाचणारा एक विशिष्ठ वर्ग असला तरी वाचनसंस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने हे चित्र थोडेसे  निराशजनक आहे. पण याचा वाचनसंस्कृतीवर काही परिणाम होईल अस वाटत नाही. कारण ज्यांना या पुस्तकांची गरज वाटते ते ही पुस्तके घेणारचं. नवी पिढी ही इंग्रजी पुस्तके वाचणारी असल्याने किंडलवर ही पुस्तके ते वाचू शकतील्य
- देवयानी अभ्यंकर, प्रकाशक, कॉन्टिनेंटल प्रकाशन
-------------------------------------------------------------------------------------------
परदेशी पुस्तकांवर सीमा शुल्क आकारल्यामुळे  पुस्तकाच्या किंमती वाढतील यात शंकाच नाही. भारतात परदेशी पुस्तके वाचणारा वाचक वर्ग मोठा आहे. पुस्तकांच्या किंमती वाढल्यामुळे वाचक मोठ्या प्रमाणावर ‘इ बुक’ कडे वळतील. परदेशी पुस्तके खरेदी करून वाचण्याकडे ओढा काहीसा कमी होईल्य
- सुनील मेहता, मेहता पब्लिकेशन
---------------------------------------------------------------------------------
तरूण पिढीमध्ये इंग्रजी पुस्तके वाचण्याचे प्रमाण अधिक आहे. या पुस्तकांची आवड असणारी युवा पिढी नवीन पुस्तकांचा शोध घेत असते. अनेक पुस्तकांची आॅनलाईन खरेदी देखील करत असते. परदेशी पुस्तकांवर सीमा शुल्क लावल्यामुळे वाचकांना अधिक दराने पुस्तकांची खरेदी करावी लागेल. मात्र या पुस्तकांच्या किंमती न परवडल्यास पायरेटेड पुस्तक खरेदी करण्याकडे देखील कल वाढू शकेल. यामुळे बनावट पुस्तकांची नवी बाजारपेठ निर्माण होऊ शकते्य
- निशांत मोरे, वाचक
--------------------------------------

Web Title: Five percent customs duty on foreign books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.